UGC NET 2022 Exam Date : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनुसार (NTA) दरवर्षी UGC NET च्या परीक्षा घेतल्या जातात. याच परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदेश कुमार यांनी UGC-NET 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार या परीक्षा आता 8 जुलै, 9, 11, 12 आणि 12, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET) परीक्षा वेळापत्रक (UGC NET 2022 Exam Date) डिसेंबर 2021 आणि जून 2022 विलीन केलेले चक्र जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी (UGC NET 2022 Exam) परीक्षेचे वेळापत्रक (UGC NET 2022 Exam Date) UGC NET च्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जाऊन तपासू शकतात.
NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “उमेदवारांना NTA वेबसाईट www.nta.ac.in, https://ugcnet.nta.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा स्पष्टीकरणासाठी, उमेदवार NTA हेल्प डेस्कला 011 40759000 वर कॉल करू शकतात किंवा NTA ला ugcnet@nta.ac.in वर लिहू शकतात.”
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनुसार (NTA) मार्फत घेण्यात येणाऱ्या UGC NET 2022 परीक्षेची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 30 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आली होती. या परीक्षेसाठी अंतिम तारीख 20 मे 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकत होते. या परीक्षेची तारीख आता 8 जुलैपासून जाहीर करण्यात आली आहे.
UGC NET ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे जी वर्षातून दोनदा घेतली जाते. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2021 परीक्षा पुढे ढकलल्यामुळे UGC NET ची जून 2022 परीक्षा देखील लांबली आहे. परीक्षा चक्र नियमित करण्यासाठी, NTA ने डिसेंबर 2021 आणि जून 2022 दोन्ही चक्र एकाच परीक्षेत विलीन केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
UGC NET 2022 : UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 20 मे पर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI