NIRF Ranking 2023: आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Union Ministry of Education) नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2023 म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचं रँकिंग जारी करण्यात आलं आहे. या यादीत निराशाजनक बाब म्हणजे, देशातील सर्वोत्तम टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra News) एकाही विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही. 

मुंबई आयआयटीनं देशातील इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटी (IIT Bombay) चौथ्या क्रमांकावर आहे. तर इनोव्हेशनच्या बाबतीत देशात मुंबई आयआयटीचा सातवा क्रमांक आहे. तर देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याच्या डी.वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

विद्येचं माहेरघर पुण्यातून मुंबईकडे शिफ्ट?

टॉप विद्यापीठांच्या यादीत टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यालयाचा समावेश नाही. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ हे या यादीत 19व्या क्रमांकावर आहे. तर मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) 23व्या क्रमांकावर आहे. तसेच, पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल हे या यादीत 32व्या क्रमांकावर आहे. 

विद्यापीठस्कोअर क्रमांक
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे  58.1919 
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 57.0723 
सिम्बायोसिस इंटरनॅशनल  (पुणे, महाराष्ट्र)53.1332 
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अॅन्ड रिसर्च 51.9239
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे50.6246
नरसी मोनजी  इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, मुंबई50.31 47
मुंबई विद्यापीठ, मुंबई 48.63 56
भारती विद्यापीठ, पुणे 43.6191
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई43.0898

महाविद्यालये 

फर्ग्युसन (स्वायत्त) महाविद्यालय पुणे 53.8879
शासकीय विज्ञान संस्था नागपूर53.5483
निर्मला निकेतन सामाजिक कार्य महाविद्यालय55.1857

व्यवस्थापनशास्त्र

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी इन्स्टिट्यूट, मुंबई71.9977
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे68.1110
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट62.74 20 
एसवीकेएम नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज 60.84 21 
 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 53.41 43 
 के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च 52. 1445 
एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च48.21 73 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट47.08 76

 संशोधन संस्था 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च   मुंबई 62.6610
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट    मुंबई 58.88  15 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिचर्स     पुणे   52.22 27 
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई48.8237

हे ही वाचा :

NIRF रँकिंगमध्ये मुंबई IIT सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत चौथं; तर दंत महाविद्यालयांमध्ये पुण्याचं डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसरे


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI