NIRF Ranking 2023: शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी आज नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2023 जारी केलं. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही ओव्हरऑल एलआयआरएफ रँकिंगमध्ये आयआयटी मद्रासनं बाजी मारली आहे. तर दुसऱ्या स्थानावर आयआयएससी बंगळुरू आहे. तिसऱ्या स्थानावर आयआयटी बॉम्बेला मागे टाकत आयआयटी दिल्लीनं कब्जा केला आहे. तर यंदा मुंबईला ओव्हरऑल एलआयआरएफ रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. 


NIRF रँकिंगमधील बेस्ट युनिवर्सिटी रँकिंगबाबत बोलायचं झालं तर, या कॅटेगरीमध्ये आयआयएससी बंगळुरूनं बाजी मारत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर त्यापाठोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे जेएनयू आणि जामिया मिल्लिया इस्लामिया या युनिवर्सिटीज आहेत. दरम्यान, NIRF रँकिंग प्लॅटफॉर्मच्या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण यादी उपलब्ध आहे. तुम्ही nirfindia.org. या वेबसाईटवर जाऊन यादी सविस्तर पाहु शकता. 


यंदा रँकिंगच्या श्रेणींमध्ये काहीसे बदल 


2022 साली NIRFच्या रॅकिंगमध्ये केवळ चार कॅटेगरी होत्या. एकूणच महाविद्यालयं आणि शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि संशोधन संस्था या चार कॅटेगरींचा 2022 पर्यंत नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या यादीत समावेश होत होता. तसेच, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कायदा, औषध, आर्किटेक्चर आणि दंतचिकित्सा यांसारख्या सात शाखांचा समावेश होत होता. दरम्यान, यावर्षी NIRF ने आणखी एका नव्या विषयाचा समावेश केला आहे. तो विषय म्हणजे, कृषी आणि संलग्न क्षेत्र. याव्यतिरिक्त आर्किटेक्चर डिसिप्लेनचं नाव बदलून  'आर्किटेक्चर अँड प्लानिंग' ठेवण्यात आलं आहे. 


आयआयटी मद्रासनं एकूण शैक्षणिक संस्थात्मक आणि अभियांत्रिकी श्रेणीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बंगळुरूनं संशोधन आणि विद्यापीठ श्रेणी अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग 2022 मध्ये प्रथम स्थान मिळविलं होतं.


ओवरऑल कॅटेगरीमध्ये टॉप 10 इंस्टीट्यूट्सची यादी 



  1. Indian Institute of Technology Madras

  2. Indian Institute of Science, Bengaluru

  3. Indian Institute of Technology Delhi

  4. Indian Institute of Technology Bombay

  5. Indian Institute of Technology Kanpur

  6. All India Institute of Medical Sciences, New Delhi

  7. Indian Institute of Technology Kharagpur

  8. Indian Institute of Technology Roorkee

  9. Indian Institute of Technology Guwahati

  10. Jawaharlal Nehru University, New Delhi


टॉप युनिवर्सिटीजची संपूर्ण यादी :



  1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू

  2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

  3. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली

  4. जाधवपूर विद्यापीठ कोलकाता

  5. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

  6. मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल

  7. अमृता विश्व विद्यापीठम् कोईम्बतूर

  8. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर

  9. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ

  10. हैदराबाद युनिवर्सिटी, हैदराबाद 


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू देशातील सर्वोच्च विद्यापीठात प्रथम क्रमांकावर आहे. तर अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास अव्वल आहे. तसेच, मिरांडा हाऊस या वर्षीही टॉप कॉलेजच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. NIRF रँकिंगची सुरुवात 2016 मध्ये झाली आणि यंदाचं रँकिंग जारी करण्याची ही आतापर्यंतची आठवी यादी आहे. जेथे 2016 मध्ये 3500 संस्थांनी रँकिंगमध्ये भाग घेतला होता. तर, यावर्षी 8,686 संस्थांनी क्रमवारीत सहभाग घेतला आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI