NIC Recruitment 2022 : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरनं अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत सायंटिस्टच्या बंपर पदांवर भरती होणार आहे. ज्यासाठी उमेदवार लवकरच अर्ज करू शकतील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट www.nic.in द्वारे भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.


रिक्त जागांचा तपशील 


नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरनं जारी केलेल्या या भरती मोहिमेद्वारे वैज्ञानिकांच्या एकूण 127 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.


शैक्षणिक पात्रता


अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे.


वयोमर्यादा


भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांचं वय 35 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावं.


वेतनश्रेणी 


भरतीप्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-11 ते लेव्हल 13 नुसार वेतन दिलं जाईल.


अर्ज शुल्क 


भरतीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 800 रुपये शुल्क भरावं लागेल.


कशी होईल निवड? 


निवड चाचणी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.


अर्ज कसा कराल? 


इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://www.nic.in द्वारे अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.


दिल्ली यूनिवर्सिटी के श्री गुरुनानक देव खालसा कॉलेजने सहाय्यक प्रोफेसर च्या एकूण 48 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवरांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी श्री गुरुनानक देव खालसा कॉलेजची अधिकृत वेबसाईट www.sgndkc.org किंवा www.du.ac.in या बेवसाईटवर भेट द्यावी. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2022 आहे.  


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Job Majha : IBPS, महापारेषण आणि ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी! 'असा' करा अर्ज


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI