NEET PG, MDS Counselling Schedule 2022 : वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) NEET PG साठी  समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर  केले आहे. वेळापत्रकानुसार समुपदेशनाची संपूर्ण प्रक्रिया 1 सप्टेंबरला सुरू होणार आहे.  समुपदेशनाची संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे केली जाणार आहे.  उमेदवारांना संपूर्ण वेळापत्रक MCC वेबसाइट mcc.nic.in वर पाहता येणार आहे


जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार  समुपदेशनाची पहिली फेरी 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. समुपदेशन नोंदणी आणि शुल्क 4 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. उमेदवारांना  2 ते  5 सप्टेंबरपर्यंत आपल्या पसंदीचे वैद्यकिय महाविद्यालय निवडता येणार आहे.  ८ सप्टेंबरला त्याचा निकाल जाहीर होणार आहे.  निवडलेले उमेदवार 9 ते 13 सप्टेंबरपर्यंत प्रवेशासाठी अहवाल देऊ शकतात. NEET PG समुपदेशनाच्या एकूण 4 फेऱ्या होतील. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेले वेळापत्रक पाहू शकतात.


समुपदेशनासाठी आवश्यक कागदपत्रे


NEET PG 2022 प्रवेशपत्र, NEET PG निकाल 2022, MBBS/BDS परीक्षेचे स्कोअरकार्ड, MBBS/BDS पदवी प्रमाणपत्र, NEET PG साठी 31 जुलै 2022 पर्यंत इंटर्नशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) किंवा राज्य वैद्यकीय परिषद (NMC) किंवा राज्य वैद्यकीय परिषद (NMC) SMC द्वारे जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र), जन्मतारीख पुरावा, वैध ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र


NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ


यंदा NEET-UG 2022 साठी रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी 2.57 लाख अधिक नोंदणी झाली असून, हा आकडा 18 लाखांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 12 भारतीय भाषांमध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत 274.3% ची वाढ झाली आहे, तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय यावेळी महिला उमेदवारांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे. यंदा या परीक्षेसाठी 10 लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे.


संबंधित बातम्या :


कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी


​NEET UG Registration 2022 : NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ, 10 लाखांहून अधिक महिला उमेदवारांची नोंदणी


NEET PG समुपदेशनासाठी ही' आहेत आवश्यक कागदपत्रे


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI