NEET 2022 Admit Card : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET UG) 2022 साठी प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच जारी करण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार, NEET UG 2022 ची प्रवेश परीक्षा 17 जुलै रोजी घेतली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी NEET UG 2022 परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे.


NEET UG 2022 : कोणत्या भाषेत परीक्षा घेतली जाईल?
NTA NEET 2022 परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूसह 13 भाषांमध्ये होणार आहे. 


NEET UG 2022 : प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नबद्दल जाणून घ्या
NEET 2022 प्रश्नपत्रिकेत 200 प्रश्न असतील आणि 200 मिनिटांच्या कालावधीसाठी आयोजित केले जातील. भारतातील सुमारे 543 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.



NEET UG 2022 अर्ज दुरुस्ती (Application Correction Window)
(NEET-UG) 2022 साठी अर्ज दुरुस्ती विंडो शुक्रवार, 27 मे 2022 रोजी बंद करण्याक आली आहे. या कालावधीत, वैद्यकीय इच्छूक ज्यांनी आधीच त्यांचे NEET UG अर्ज 2022 सबमिट केले आहेत ते बदल करू शकतात. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-अंडर ग्रॅज्युएट (NEET UG 2022) अर्जाचा फॉर्म भरण्यासाठी 20 मे पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती.


NEET UG प्रवेशपत्र 2022 डाउनलोड कसे कराल?
NTA NEET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - neet.nta.nic.in.
मुख्यपृष्ठावर, “NEET-UG 2022 प्रवेशपत्र” असलेल्या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा 
सबमिट वर क्लिक करा.
तुमचे NEET UG 2022 प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल
NEET UG 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करा 
तसेच भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.


त्यामुळे ही परीक्षा घेतली जाते
MBBS, BDS, आयुष पदवी, B.Sc नर्सिंग, B.Sc लाइफ सायन्सेस आणि पशुवैद्यकीय अभ्यासक्रम यांसारख्या पदवीपूर्व वैद्यकीय आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. याशिवाय, NTA आज NEET UG अर्ज करेक्शन विंडो बंद करेल. ज्या उमेदवारांना बदल करायचे आहेत ते अधिकृत साइट neet.nta.nic वर जाऊन तसे करू शकतात.


संबंधित बातम्या


NEET 2022: ...ही तर NEET PG परीक्षार्थींची उघड लूट; FAIMA चा गंभीर आरोप


NEET UG 2022 Registration : नीट परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची मुदत वाढवली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज


NEET-PG परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका; म्हटले, "हे तर विद्यार्थी हिताच्या विरोधात"


NEET PG परीक्षा पुढे ढकललेली नाही; बनावट नोटीस व्हायरल झाल्यानंतर NBE चं स्पष्टीकरण


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI