NEET PG Exam : 21 मे रोजी होणारी NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. परीक्षा पुढे ढकलणे म्हणजे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 2021 ची मेडिकल पीजी प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे 2022 ची परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती.


IMA ने आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवियांना लिहिले होते पत्र


इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. IMA ने आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांना पत्र लिहून NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. NEET PG 2022 ची परीक्षा 21 मे रोजी घेतली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, NEET PG 2021 समुपदेशनाला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होते. त्यानंतर आयएमएनेही आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते.


 






विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी


इंडियन मेडिकल असोसिएशनने या पत्रात पुढे म्हटले होते की, राज्यांमधील रिक्त पदांसाठीचे समुपदेशन मेच्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. IMA ने पत्रात नमूद केले आहे की, 05 ते 10 हजार इंटर्न, ज्यांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून काम केले आहे, त्यांच्या परीक्षा पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना NEET PG ला बसता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन NEET PG परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. असे करणे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI