National Education Policy : संसदेच्या स्थायी समितीने शालेय अभ्यासक्रमात (Education News) बदल करण्याची शिफारस केंद्र सरकारला (Central Government) केली आहे. शालेय पुस्तकांमध्ये सर्व धर्मातील महापुरुषांचा समावेश करण्यात यावा, अशी शिफारस समितीने केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, धार्मिक शिकवणीमुळे मुलांना त्यांच्या धर्माची आणि संस्कृतीची माहिती मिळते. ही समिती शिक्षण मंत्रालयाशी संलग्न संसदेची स्थायी समिती आहे. जिने केंद्र सरकारला अभ्यासक्रमात बदल करण्याची शिफारस केली आहे.


महिला सक्षमीकरणाचा होणार समावेश 


संसदीय स्थायी समितीने सुचवले की, धार्मिक शिकवणीचा समावेश सुधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) मध्ये करावा, तसेच शालेय मुलांना भारताच्या अर्थव्यवस्था आणि संरक्षण उत्पादनातील वाढीचा इतिहास शिकवला पाहिजे. अभ्यासक्रमात महिला सक्षमीकरणाचा समावेश करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.


शाळेतून मिळेल धर्माचे ज्ञान


समितीने शिफारस केली आहे की, NCERT आणि SCERT ने शालेय अभ्यासक्रमात वेद आणि इतर प्राचीन ग्रंथांशी संबंधित शिक्षण आणि ज्ञान समाविष्ट करावे. यातून मुलांना जीवन आणि समाजाशी संबंधित शिक्षण मिळेल, असे समितीचे म्हणणे आहे. या शिफारशी अशा वेळी करण्यात आल्या आहेत, जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या संयुक्त विद्यमाने शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येत आहेत. तसेच याच्या फ्रेमवर्कमध्ये देखील सुधारणा करण्यात येत आहे.


स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती


समितीने अशीही मागणी केली की, आतापर्यंत माहित नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समान महत्त्व देऊन समावेश करावा, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला एनसीईआरटीच्या सहकार्याने आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. समितीने म्हटलंय की, “यापूर्वी देशातील महान स्वातंत्र्यसैनिकांना अपराधी म्हणून दाखवण्यात आले आहे. शीख आणि मराठा इतिहासाचे खराब प्रतिनिधित्व तसेच पुस्तकांमध्ये महिला सक्षमीकरणाबाबत कमी जागा देण्यात आली आहे. 


शिक्षण मंत्रालयाने स्वीकारल्या सूचना 


शिक्षण मंत्रालयाने यावर माहिती देताना सांगितले की, “पॅनलच्या विविध सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. नवीन अभ्यासक्रमाच्या चौकटीत त्यांचा समावेश केला जाईल." इयत्ता 6 वी आणि 7 वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वेद आणि भगवद्गीता शिकवली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली. त्याला उत्तर देताना समितीने इतर सर्व धर्मांच्या शिकवणी आणि प्राचीन ग्रंथांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समितीने म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच; NIA चा आरोपपत्रात दावा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI