Mumbai University Admission 2022 : मुंबई विद्यापीठाने पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या (Mumbai University UG Admissions 2022) प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी (Mumbai University UG Admissions Second Merit List)प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांनी मुंबई विद्यापीठातून पदवीसाठी (Mumbai Colleges Under Graduate Admissions 2022) अर्ज केला आहे ते दुसऱ्या यादीत निवडले गेले आहेत की नाही हे तपासण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला mu.ac.in भेट देऊ शकतात.
या आधारे तयार केली दुसरी गुणवत्ता यादी
मुंबई विद्यापीठाने यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी (Mumbai University UG Admissions 2022 Second Merit List)उर्वरित जागांच्या आधारावर तयार केली आहे. यासोबतच उमेदवारांच्या पात्रता गुणांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.
या तारखेपूर्वी पडताळणी करून घ्या
मुंबई विद्यापीठात यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी निवडलेल्या उमेदवारांना 8 जुलै ते 13 जुलै या कालावधीत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी पूर्ण करावी लागेल आणि घोषणा फॉर्म किंवा हमीपत्रासह शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. तारखेनंतर ही सुविधा मिळणार नाही.
या कागदपत्रांची असेल आवश्यकता
ऑनलाइन डॉक्युमेंट वेरिफिकेशनसाठी ही कागदपत्रे आवश्यक असतील. पत्त्याचा पुरावा, इयत्ता 12वी सोडल्याच्या प्रमाणपत्राची अटेस्टेड कॉपी, इयत्ता 10वी आणि 12वीची गुणपत्रिका, कंडक्ट प्रमाणपत्र, ट्रांसफर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि वैध ओळखपत्र.
तिसरी गुणवत्ता यादी
मुंबई युनिव्हर्सिटी यूजी ऍडमिशन 2022 ची तिसरी गुणवत्ता यादी 14 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. MU 3री मेरिट लिस्ट 2022 साठी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया 14 जुलै ते 16 जुलै दरम्यान आयोजित केली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ESIC Recruitment 2022 : ESIC कडून 400 हून अधिक पदांवर भरती जाहीर;18 जुलै शेवटची तारीख, कसा कराल अर्ज?
- MPSC Group B Recuritment : MPSC मध्ये नोकरीची संधी; 800 पदांवर भरती, लवकर करा अर्ज
- Job Majha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, कोचीन शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI