मुंबई (Mumbai) : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. कारण उन्हाळी परीक्षेचे निकाल (Exam Result) राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांना आता एटी-केटी परीक्षा (ATKT Exam) द्यावी लागणार आहे. राखीव निकाल ठेवलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तातडीने जाहीर करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.


राखीव निकाल ठेवलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी


एप्रिल ते जून महिन्यात झालेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा अनेक विद्यार्थ्यांचा निकाल विविध कारणांमुळे मागील 2 ते 3 महिन्यांपासून विद्यापीठाकडून राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राखीव ठेवेलल्या विद्यार्थ्यांना निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी एटीकेटी परीक्षेसाठी अर्ज करुन परीक्षा द्यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असं या विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यामध्ये राखीव निकाल ठेवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आहेत तर काही विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी आहेत. तर काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


10 ऑक्टोबरपर्यंत एटीकेटी परीक्षेचे अर्ज करण्याच्या सूचना


त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव आहे त्यांनी 10 ऑक्टोबरपर्यंत एटी-केटी परीक्षेचे अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन विद्यार्थी आधीच्या राखीव निकालामध्ये नापास झाल्यास एटीकेटी परीक्षेला सामोरे जाऊन त्याचं नुकसान टाळता येऊ शकेल. विद्यापीठ ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे निकाल तातडीने जाहीर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मागील काही दिवसात यातील काही विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहेत.


हेही वाचा


Exam : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या तारखा जाहीर, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार परीक्षा


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI