MPSC Recruitment 2022 :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर झालं आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता एमपीएससीमार्फत सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. 

एमपीएससीमार्फत जानेवारी, 2022 मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन जानेवारी 2022 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी रोजी हाणार आहे.  महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा -2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारीला होणार आहे. आधी ही परीक्षा 22 जानेवारी रोजी होणार होती. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020, पेपर क्रमांक 2 ,पोलिस उपनिरीक्षक परीक्षा आता 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार होती.  

कोरोना विषाणूच्या पार्दुर्भाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येमाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजानाच्या अनुषंगाने आयोदाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकरन करणे उमेदरवारांच्या हिताचे राहील, असे एमपीएससीने जारीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलेय.

यंदा साडेसात हजार पदांसाठी भरती निघणारमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) डिसेंबर 2021 पर्यंतच्या राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांच्या माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात सात हतार 560 जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या जागा 2022 मध्ये भरण्यात येतील. त्यामुळे या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्याच्या 25 विभागांमधील रिक्त असलेल्या पदांच्या संख्यानुसार राज्यात तिन्ही गटांच्या एकूण  सात हजार 560 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ‘अ’ गटातील 1499, ‘ब’ गटातील 1245 आणि ‘क’ गटातील 1583 पदांचा समावेश आहे. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'एमपीएससी'कडे प्राप्त मागणीपत्र...

सार्वजनिक आरोग्य विभाग : 937कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : 924उद्योग, ऊर्जा, कामगार : 279अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : 62पाणी पुरवठा व स्वच्छता : 16सामान्य प्रशासन : 957मराठी भाषा : 21आदिवासी विभाग : 7बृन्हमुंबई महापालिका : 21पर्यावरण : 3गृह : 1159वित्त : 356वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : 1572उच्च व तंत्रशिक्षण : 35शालेय शिक्षण, क्रीडा : 105सहकार, पणन, वस्त्रोद्योग : 32कौशल्य विकास, उद्योजकता : 171महसूल व वन : 104ग्रामविकास व पंचायतराज : 32नगरविकास : 90मृदा व जलसंधारण : 11जलसंपदा : 323विधी व न्याय : 205नियोजन : 55


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI