मुंबई: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने (Maharashtra State Common Entrance Test Cell) तीन वर्षाच्या एलएलबी कोर्ससाठीच्या (LLB 3 years) पहिल्या फेरीचा (MHT CET Seat Allotment Result) निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल cetcell.mahacet.org या वेबसाईटवर पाहायला मिळेल. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल.
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा,
1. सर्वप्रथम cetcell.mahacet.org या वेबसाईटवर भेट द्या.
2. होमपेजवर एमएच सीईटी 2022 राऊंड 1 सीट अलॉटमेंटवर क्लिक करा.
3. त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
4. त्यानंतर एमएच सीईटी 2022 राऊंड 1 सीट अलॉटमेंट निकाल आपल्या समोर येईल.
एमएच सीईटी 2022 राऊंड 1 सीट अलॉटमेंट या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या दरम्यान सीट अलॉटमेंट सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागेल. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ते फी भरु शकतात. आपल्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकशनसाठी विद्यार्थ्यांना त्या-त्या महाविद्यालयात जावं लागेल.
विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाची बातमी :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI