Maharashtra SSC Result 2023 : गुणपत्रिका 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करा; पण शाळेत मिळणार 14 जूनला!

Maharashtra SSC Result 2023 live updates : ऑल द बेस्ट! उद्या दहावीचा निकाल, एबीपी माझावर झटपट पाहण्याची सुविधा; प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर 

abp majha web team Last Updated: 03 Jun 2023 12:53 PM
Thane SSC News: ठाण्यातील गौतमीला दहावीत 100 टक्के मार्क

Thane SSC News: ठाणे शहरातील बी केबीन परिसरात राहणाऱ्या गौतमी सहस्त्रबुद्धे या विद्यार्थीनाला इयत्ता दहावीच्या परिक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहे. गौतमी ही ए. के. जोशी शाळेची विद्यार्थींनी आहे. ती विज्ञान या शाखेत शिकून भविष्यात इंजिनिअर होण्याची इच्छा तिने व्यक्त केली. 90 टक्क्यांच्या वर गुण मिळतील पण 100 टक्के मिळतील असे वाटले नव्हते असे गौतमीने सांगितले. गौतमीची आई गौरी आणि वडील संदीप यांनी तीच्या यशाचे कौतुक केले आहे.

Maharashtra SSC Result 2023 : गुणपत्रिका 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करा; पण शाळेत मिळणार 14 जूनला!
. शाळेत 14 जूनचा गुणपत्रिका मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच तुम्हाला गुणपत्रिका  MH10.ABPMajha.Com या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना त्यांची गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.  Read More
Nashik News : नाशिक शहरातील औदयोगिक संघटनांचा बंद मागे , उदय सामंत यांची मध्यस्थी

Nashik News : निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावरील झालेला हल्ला प्रकरणी आज नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत बंद ठेवण्यात येणार होती. मात्र हा बंद मागे घेण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्र पाठवून मध्यस्थी केली आहे. येत्या 7 व 8 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.

Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाबाबत आक्षेप आहे? गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करायचंय? उत्तरपत्रिका मिळवायचीय? तर हे करा!
दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकालासंदर्भात काही आक्षेप असेल किंवा  गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची मुदत 3 जून सोमवार ते 12 जून पर्यंत आहे. Read More
SSC Result : दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra SSC Result 2023 : कुठे पाहता येणार निकाल?

Maharashtra SSC Result 2023 : विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्ही अगदी काही सेकंदात निकाल पाहू शकता. महाराष्ट्र बोर्डानं निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वरही पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करावं लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोडही करता येणार आहे. 

10th Result : दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये कोणती?

10th Result : दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये! 


* राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
* पुनर्परीक्षार्थीं विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 60.90 टक्के
* खाजगी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण  74.25
* दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.49 टक्के 
* राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98.11टक्के
* एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के 
* मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त
* राज्यातील 5,26,210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85218 उत्तीर्ण
* 14 जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील
* यावर्षी दहावीचा निकाल 93.83 , मागील वर्षी तो 96.94 टक्के होता. याचा अर्थ मागील वर्षीपेक्षा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला.

SSC Result : दहावीच्या निकालात मुलींची बाजी

SSC Result : बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.05 टक्के आहे.  


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे. 

Maharashtra SSC Result 2023 LIVE: MSBSHSE 10वीचा निकाल जाहीर, दुपारी 1:00 वाजता निकाल पाहा

Maharashtra SSC Result 2023 LIVE: MSBSHSE 10वीचा निकाल 2023 जाहीर झाला आहे.

10th Result : कोकण विभाग अव्वल तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल

10th Result : कोकण विभाग अव्वल तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल


दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नाशिक आणि नागपूर विभागाने कामगिरी केली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी  92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. 


विभागवार निकाल


कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल घसरला, राज्याचा निकाल 93.83 टक्के

Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

SSC Result 2022 : राज्याचा निकाल 93.8. टक्के, 43 शाळांचा निकाल शून्य टक्के; 29 शाळांचा निकाल 100 टक्के
SSC Result 2022 : दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. Read More
SSC Result 2023 : यंदाही पोरीच अव्वल, तर कोकण विभाग नंबर वन; पाहा विभागनिहाय टक्केवारी
Maharashtra 10th Result 2023 : दहावीचा निकाल 93 पूर्णांक 83 टक्के, बारावीप्रमाणे दहावीतही मुलींची बाजी.

95 पूर्णांक 87 टक्के मुली पास. कोकण विभागाचा सर्वाधिक 98 पूर्णांक 11 टक्के तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल. Read More
Maharashtra SSC Result 2023 Live : MSBSHSE महा राज्य बोर्ड एसएससी निकाल पीसी सुरू

MSBSHSE महा राज्य बोर्ड एसएससी निकाल पीसी सुरू. हाराष्ट्र SSC निकाल 2023 लाइव्ह अपडेट्स: MSBSHSE 10वीचा निकाल 2 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. नवीनतम अद्यतनांसाठी ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra SSC Result 2023 Live : ११ वाजता जाहीर विभागनिहाय निकाल

११ वाजता जाहीर विभागनिहाय निकाल, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये परीक्षा


दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

Maharashtra SSC Result 2023 Live: MSBSHSE 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे

महाराष्ट्र SSC निकाल 2023 लाइव्ह अपडेट्स: MSBSHSE 10वीचा निकाल 2 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. नवीनतम अद्यतनांसाठी ब्लॉग फॉलो करा.

MSBSHSE 10th SSC Result 2023: मागील वर्षांची आकडेवारी

एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी: 96.94%


मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी : 97.96%


 मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी : 96.06%


महाराष्ट्र बोर्डानं निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वरही पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करावं लागेल

SSC Result 2023 Website : 10वी निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड अधिकृत वेबसाइट लिंक

Maharashtra 10th result 2023 date: June 2, 2023


Maharashtra SSC result 2023 time: 1 pm on official website


10th result 2023 Maharashtra Board website: mahresult.nic.in


 दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

10th SSC Result 2023 Maharashtra Board: गेल्या 10 वर्षांतील उत्तीर्णतेची टक्केवारी

गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94% होती. सुमारे 15,68,977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 96.06% आहे, तर 97.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. MAHARASHTRA SSC 10TH RESULT 2023 Live : दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

SSC Examination Result 2023 : इयत्ता 10वीच्या परीक्षा कधी घेण्यात आल्या?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत 2023 च्या महा इयत्ता 10वीच्या परीक्षा घेतल्या.

Maharashtra Board SSC Result 2023 Date And Time : महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 तारीख आणि वेळ

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज, २ जून रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निकालाची लिंक दुपारी 1 च्या सुमारास सक्रिय होईल.

Maharashtra Board SSC Result 2023 Today : महाराष्ट्र बोर्ड SSC चा निकाल 2023

महाराष्ट्र इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाली होती. त्याचा निकाल जाहीर होणार आहे.

Maharashtra Board 10th Result: आज दहावीचा निकाल; ABP Majhaच्या वेबसाईटवर निकाल पाहण्याची सुविधा
Maharashtra Board 10th Result: दहावीचा निकाल आज जाहीर होणार असून उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहाता येणार आहे. Read More

पार्श्वभूमी

ऑल द बेस्ट! उद्या दहावीचा निकाल, एबीपी माझावर झटपट पाहण्याची सुविधा; प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर 


Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच  2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, त्याचप्रमाणे 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही दहावीचा निकाल सर्वात आधी पाहता येणार आहे. यंदा निकालाची प्रत डाऊनलोड करण्याचा ऑप्शन देखील 'एबीपी माझा'च्या साईटवर देण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे. 


Maharashtra SSC Result 2023 : कुठे पाहणार निकाल


महाराष्ट्र बोर्डानं निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वरही पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करावं लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोडही करता येणार आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे. 



Maharashtra SSC Result 2023 : एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा 


स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.