Maharashtra Public Service Commission: राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक/पारंपरिक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरे लिखाण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं बदल केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. काही पेपर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडविणे आवश्यक असल्याची सूचना करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील पेपरच्या माध्यमातून पुढील प्रमाणे सूचित करण्यात आल्या आहेत.  मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक तीन ते सात पाचही पेपर एकतर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडविणे आवश्यक राहील, असा बदल करण्यात आला आहे. त्याशिवाय 


तर पेपर क्रमांक आठ व नऊ,  वैकल्पिक विषय पेपर एक व दोन विषयातील ज्या पेपर साठी केवळ मराठी भाषेचे माध्यम निश्चित केले आहेत त्याकरिता उमेदवाराने मराठी भाषेतून उत्तरे सोडविणे अनिवार्य राहील. वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी केवळ इंग्रजी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे त्याकरिता उमेदवारांनी इंग्रजी भाषेतून उत्तर सोडविणे  अनिवार्य राहील, असे लोकसेवा आयोगानं स्पष्ट केलेय. 


वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी 'मराठी व इंग्रजी' भाषेचे माध्यम निश्चित केले आहेत त्याकरिता उमेदवारी 'मराठी किंवा इंग्रजी' यापैकी एकाच भाषेची निवड करणे अनिवार्य राहील... निवड केलेल्या भाषेचे माध्यम व वैकल्पिक विषयाकरिता दोन्ही पेपर करिता अनिवार्य राहतील, असे आयोगाकडून सांगण्यात आलेय.  






मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर -
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे  केंद्रावरील उमेदवारांच्या दिनांक 02 ते 06 जानेवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे दुसऱ्या टप्प्यातील आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्याशिवाय दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग  मुख्य परीक्षा, 2021 या पदाच्या  दिनांक 9 ते 17 जानेवारी, 2022 या कालावधीत आयोजित मुलाखती आयोगाचे मुख्य कार्यालय, मुंबई येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI