HSC Exam Scam: बारावीच्या परीक्षेच्या (HSC Exam) भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे आढळून आल्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. तर मंगळवारपासून शिक्षण मंडळाने संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली असून, त्यांना नोटीसा पाठवण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र उत्तरपत्रिकामध्ये असलेले दुसरे हस्ताक्षर आमचे नसल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हे हस्ताक्षर कोणाचे असा प्रश्न शिक्षण मंडळाला पडला आहे. मात्र एकाच पेपरला एवढ्या विद्यार्थ्यांच्या  हस्ताक्षरामध्ये बदल कसा झाला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे निकालावरच आता प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. तर या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली जाईल, विद्यार्थ्यांनी लिहिलं नाही तर नक्की कोणी लिहिले या प्रकरणाचा शोध घेण्यात येईल असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


काय आहे प्रकरण? 


बारावीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे समोर आले. त्यामुळे याची माहिती शिक्षणमंडळाला देण्यात आली. त्यामुळे शिक्षण मंडळाने अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीसा पाठवत, चौकशीसाठी बोलावले आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांची मंगळवारी 9 मे पासून चौकशी केली जात आहे. दरम्यान पहिल्यास दिवशी चौकशी समितीने 87 प्रकरणात विद्यार्थ्यांचे म्हणणे आयकून घेतले आहेत. विशेष म्हणजे बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत हा सर्व प्रकार समोर आला आहे. तर चौकशीसाठी बोर्डात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. तर दुसरे हस्ताक्षर कोणाचे आहे आम्हाला माहित नाही. आमच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याने कोणी व का लिहिले, याबाबत आम्हाला देखील आश्चर्य वाटत असल्याचे विध्यार्थी म्हणाले आहेत. 


गरज पडली तर केंद्रप्रमुखांचीही चौकशी


या सर्व प्रकरणावर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांची प्रतिक्रिया समोर आली असून,  बारावी परीक्षेत फक्त्त भौतिकशास्त्र विषयातच हा गंभीर प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनात आले असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. 12 मेपर्यंत विद्यार्थ्यांची चौकशी होईल. तसेच विद्यार्थ्यांकडून लेखी म्हणणे घेतले आहे. गरज पडली तर संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल. बोर्डाच्या नियमावलीनुसार यासंदर्भात निर्णय घेतला जाईल,असेही साबळे म्हणाले. 


निकालावर परिणाम होण्याची शक्यता...


दहावी-बारावीचा निकाल वेळत लागणार असल्याचं यापूर्वी शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील तीनशे पेक्षा विद्यार्थ्यांच्या बारावी परीक्षेच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे आढळून आले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता असून, निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


SSC HSC Exam Result : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI