Hindi Language in Education:  राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या (English Medium)  शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा (Hindi Lagunage) शिकवली जाईल. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. हिंदी भाषेच्या सक्तीमुळे या शैक्षणिक धोरणाबाबत वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. (New Education Policy in Maharashtra)

सीबीएसई अभ्यासक्रमावर (CBSE) आधारित नव्या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी, चौथी, सहावीसाठी नवे शिक्षण धोरण लागू करण्यात येईल. 2028-29 पर्यंत राज्यात बारावीपर्यंत सर्व इयत्तांसाठी नवे शिक्षण धोरण लागू होईल. 

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील. तसेच नव्या शैक्षणिक धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्वमाध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरले जातील.

पारंपरिक पद्धतीऐवजी 5-3-3-4 रचना

नव्या शैक्षणिक धोरणानुसार वय 3 ते 8 वर्षापर्यंत बालवाटिका म्हणजे 1,2,3 तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीचा पायाभूत स्तरामध्ये समावेश असेल. त्यानंतर वय 8 ते 11 म्हणजे इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी  यांचा पूर्वतयारी स्तरामध्ये समावेश असेल. तर वय 11 ते 14 वयोगट म्हणजे इयत्ता सहावी, सातवी आणि आठवी यांचा पूर्व माध्यमिक स्तरात समावेश असेल. तर माध्यमिक स्तरामध्ये 14 ते 18 वयोगट म्हणजे नववी ते बारावी इयत्तेचा समावेश असेल. नव्या धोरणानुसार 10+2+3 या पारंपरिक धोरणाऐवजी आता 5+3+3+4 अशा शैक्षणिक आकृतीबंध असेल. 

आणखी वाचा

70 टक्के CBSE तर 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम, भाषेसह इतिहास भूगोलाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार

घाटकोपरमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्या मराठी कुटुंबाला जैन, गुजरात्यांकडून अपमानास्पद वागणूक, मनसेने समज दिली अन्...


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI