Marathi vs Non Marathi: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने मराठी विरुद्ध अमराठी हा वाद सातत्याने रंगताना दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात घडला. येथील एका गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल सोसासटीत मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला (Marathi Vs Non Marathi) अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शाह नावाच्या एका व्यक्तीने मांसाहार (Non-vegetarian food) करण्यावरुन संबंधित कुटुंबाला, 'मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो', असे म्हटले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे, मराठी नव्हे, असे वक्तव्य केले होते. त्याच घाटकोपरमध्ये (Ghatkoper News) हा प्रकार घडल्याने अमराठी लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

या सोसायटीत बहुतांश कुटुंब ही जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत. तर केवळ चार मराठी कुटुंब आहेत. गेल्या काही दिवसांपासून मांसाहार खाण्याच्या मुद्द्यावरुन या मराठी कुटुंबांना जैन आणि गुजराती बांधव त्रास देत आहेत. शाह नावाच्या व्यक्तीने याच कारणावरुन एका मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार समजल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते या सोसायटीत घुसले. मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरत संबंधित गुजराती आणि जैन कुटुंबीयांना या सगळ्याचा जाब विचारला. तेव्हा शाह नावाची व्यक्ती समोर आलीच नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाशी आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही, आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणत नाही, अशी सारवासारव करताना दिसले. 

MNS warns Non Marathi: मनसैनिक राज पार्टे यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

या घाटकोपरमध्ये आम्ही मराठी माणसासाठी रोज रोज किती भांडायचं, तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो. संपूर्ण सोसायटी गुजराती फक्त 4 जण मराठी. रोजचा यांचा त्रास मराठी माणसाला, खालच्या दर्जाची भाषा वापरून रोजचा अपमान. आज घुसलो कायते ऐकदा होऊनच जाऊ दे. सगळ्यांची .. फाटली, असे मनसैनिक राज पार्टे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आणखी वाचा

अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं

अमराठी शाकाहारी लॉबीची मुजोरी मोडीत निघणार? मुंबईत मराठी माणसाला घरखरेदीत 50 टक्के आरक्षणाची मागणी