मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल (HSC Result) 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली. या निकालानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बारावीचे विद्यार्थी चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन करतो,असं दीपक केसरकर म्हणाले. शालेय शिक्षण मंत्र्यांनी दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result Date Update) कधी लागणार याबाबत माहिती दिली. दहावीचा निकाल देखील 27 मे पर्यंत लागेल, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
दहावीची निकाल कधी लागणार?
दहावीचा निकाल 27 मे पर्यंत लागेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया 24 तारखेपासून सुरु होत आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते तर इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रवेशप्रक्रिया होते, असं दीपक केसरकर म्हणाले. बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस अगोद जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता.मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदानं होणं बाकी होतं. त्यामुळं राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला असं दीपक केसरकर म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचं असल्यास ते बसू शकतात, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.
आरटीई प्रवेशासाठी पालकांनी खोटी कागदपत्रे बनवून प्रवेश घेणं चुकीचं आहे. खोटी कागदपत्रं तयार करणं गुन्हा आहे. कारवाई झाल्यानं पालक खोटी कागदपत्रं सादर करणार नाहीत, अशी खात्री असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. आरटीई प्रवेशाबाबत गैरप्रकार घडू नयेत याबाबत सूचना देणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. आरटीई प्रवेशप्रक्रिया जिल्हास्तरावर होत असते, असं केसरकर म्हणाले.
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त महाराष्ट्र असं अभियान चालवलं जातं, असं केसरकर म्हणाले. बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारल्यानं आनंद आहे, असं केसरकर म्हणाले. कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला आहे त्यामुळं तिथल्या मुलांचं अभिनंदन करतो, असं दीपक केसरकर म्हणाले.
16 जुलैच्या दरम्यान पुन्हा परीक्षा होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी आहे. ऑगस्टमध्ये निकाल जाहीर होईल, असं केसरकर म्हणाले.
संबंधित बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI