Maharashtra SSC 10th Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. यंदाचा 22,921 शाळांपैकी 12,210 शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. पाहूयात राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी....
राज्यातील 122 टक्के विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. 35 टक्के ते 45 टक्के गुण मिळवणारे 42, 170 विद्यार्थी आहेत. 75 टक्क्यांपेक्षा पुढे गुण मिळवणारे विद्यार्थी हे 6,50,5779 आहेत.
100 टक्के गुण मिळवलेले विभागनिहाय विद्यार्थी-
पुणे 5
नागपूर 0
औरंगाबाद 18
मुंबई 1
कोल्हापूर 18
अमरावती 8
नाशिक 1
लातूर 70
कोकण 1
राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.
दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?
स्टेप 1 : https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI