Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.

वन विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे विविध पदांच्या 4 जागांसाठी भरती निघाली आहे. या जागांसाठी 17 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय, पुणे येथेही विविध पदांची भरती आहे. या जॉबच्या संधीविषयी सविस्तरपणे जाणून घ्या.

वन विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officerएकूण जागा  : 02 शैक्षणिक पात्रता : M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स मान्यता प्राप्त विद्यापीठातुन किमान 60% गुणांसह पदव्युतर पदवीधर प्राधान्य - वन्याजीव उपचार आणि हाताळण्याचा अनुभव आवश्यक आहे. तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल. पशुवैद्यकीय पर्यवेक्षक/ Veterinary Supervisorएकूण जागा : 02 शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक आणि उच्चशिक्षीत उमेदवार प्राधान्य, प्राधान्य -पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सहाय्याक आणि वन्याजीव हाताळण्याचा अनुभव तसेच मानधनासंबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल.  नोकरीचं ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारेवयो मर्यादा : 65 वर्षापर्यंत.अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2021 E-Mail ID : dcf_nagdiv@yahoo.co.in

अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे विविध पदांची भरती पहिली पोस्ट : अभियंता मेट/ Engineer Mateएकूण जागा : 01 शैक्षणिक पात्रता :

  1. दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष
  2. मासेमारी जहाज प्रमाणपत्रांचे इंजिन चालक धारक 
  3. 05 वर्षे अनुभव

दुसरी पोस्ट- कारागीर/ Artisan

जागा : 01

शैक्षणिक पात्रता :

  1.  डिप्लोमा इन मेक / इलेक्ट्रिकल इंजि.
  2.  02 वर्षे अनुभव

तिसरी पोस्ट - ट्रेड्समन/ Tradesman

जागा : 01 

शैक्षणिक पात्रता : 

  • 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
  • मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रीशियन मधील आयटीआय प्रमाणपत्र
  • 02 वर्षे अनुभव

चौथी पोस्ट - सीमन/ Seaman एकूण जागा : 05  शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
  2. 03 वर्षे अनुभव

पाचवी पोस्ट - ग्रीझर/ Greaser एकूण जागा : 02  शैक्षणिक पात्रता :

  • 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 0
  • 02वर्षे अनुभव

सहावी पोस्ट- अकुशल औद्योगिक कामगार/ Unskilled Industrial Worker एकूण जागा : 03 शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र) वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 9 सप्टेंबर 2021 अर्ज पद्धती : ऑफलाईन अर्ज पाठिवण्याचा पत्ता : The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune, 4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune – 411 001. अधिकृत संकेतस्थळ : www.punecustoms.nic.in


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI