मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.


भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (विविध पदांच्या 187 जागांसाठी भरती)


पहिली पोस्ट- पदवीधर अप्रेंटिस



  • एकूण जागा - 42

  • शैक्षणिक पात्रता - 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी


दुसरी पोस्ट - टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस



  • एकूण जागा - 45

  • शैक्षणिक पात्रता - इंजिनीअरिंग डिप्लोमा

  • वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

  • नोकरीचं ठिकाण - मुंबई

  • अर्ज करण्याची शेटची तारीख - 21 सप्टेंबर 2021

  • ऑनलाईन पद्धतीने www.bharatpetroleum.com या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. 


गार्डन रीच बिल्डर अँड इंजिनिअर लि. (विविध पदांच्या 262 जागांसाठी भरती)


पहिली पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)



  • एकूण जागा - 170

  • शैक्षणिक पात्रता- ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)


दुसरी पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)



  • एकूण जागा - 40

  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण


तिसरी पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस



  • एकूण जागा - 16

  • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात BE/B.Tech


चौथी पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस



  • एकूण जागा - 30

  • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा


पाचवी पोस्ट - HR ट्रेनी



  • एकूण जागा - 6

  • शैक्षणिक पात्रता - MBA /PG पदवी / PG डिप्लोमा

  • वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑक्टोबर 2021

  • ऑनलाईन पद्धतीने grse.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे.


विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र 



  • पोस्ट – विशेषज्ञ

  • एकूण जागा – 49

  • शैणक्षिक पात्रता – विमा क्षेत्रातला 10 वर्षांचा अनुभव

  • अर्ज ईमेल करायचा आहे.  ईमेल आयडी आहे- Specialist.life@cioins.co.in आणि Specialist.general@cioins.co.in

  • अधिकृत वेबसाईट - www.cioins.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर notifications मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI