मुंबई : चांगली नोकरी सर्वांनाच हवी असते, मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांपुढे आहे. 'जॉब माझा'च्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा या विषयीची माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) आणि BSF(सीमा सुरक्षा दल) विभागातील नोकरीच्या संधींबाबत जाणून घेणार आहोत. 

IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन)

(संपूर्ण देशभरात ही भरती होतेय)

पोस्ट – लिपिक

एकूण जागा – 5, 858

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतली पदवी, संगणक ज्ञान/ पदविका

वयोमर्यादा – 20 ते 28 वर्ष

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे 

अधिकृत वेबसाईट -  IBPS.IN 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2021

BSF(सीमा सुरक्षा दल)

(संपूर्ण देशभरात ही भरती होतेय)

सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 175 जागांसाठी भरती होणार आहे. या पोस्टविषयी आपण टप्प्या-टप्प्यानं माहिती समजून घेऊया. 

1. पहिली पोस्ट - एसआय (स्टाफ नर्स)/ SI (Staff Nurse)

एकूण जागा – 37

शैक्षणिक पात्रता – 12वी पास, नर्सिंगमध्ये पदविका/ पदवी

2. दुसरी पोस्ट – असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक

एकूण जागा – 54

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा

3. तिसरी पोस्ट - एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ

एकूण जागा – 28

शैक्षणिक पात्रता - बारावी पास, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमध्ये पदविका

4. चौथी पोस्ट – हवालदार

एकूण जागा – 15

शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण, 2 वर्षांचा अनुभव

5. पाचवी पोस्ट – असिस्टंट रेडिओ मेकॅनिक

एकूण जागा – 11

शैक्षणिक पात्रता – 3 वर्षांचा डिप्लोमा

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

 

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट - www.bsf.nic.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2021

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI