Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय नौदल आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे..... 


भारतीय नौदल


पोस्ट – ट्रेड्समन स्किल्ड


एकूण जागा – १ हजार ५३१  (य़ात इलेक्ट्रिकल फिटरसाठी १६४ जागा, इलेक्ट्रो प्लेटरसाठी १० जागा, इंजिन फिटरसाठी १६३ जागा, फाऊंड्रीसाठी ६ जागा, पॅटर्न मेकरसाठी ८ जागा, ICE फिटर पदासाठी ११० जागा, इन्स्ट्रुमेंट फिटर पदासाठी ३१ जागा, मशिनिस्टसाठी ७० जागा, मिलराइट फिटरसाठी ५१ जागा, पेंटरसाठी ५३ जागा, प्लेटरसाठी ६० जागा, शीट मेटल वर्कर पदासाठी १० जागा, पाईप फिटरसाठी ७७ जागा, रेफ्रिजरेटर आणि AC फिटर पदासाठी ४६ जागा, टेलरसाठी १७, वेल्डरसाठी ८९ जागा, रडार फिटरसाठी ३७ जागा, रेडिओ फिटरसाठी २१ जागा, रिगरसाठी ५५ जागा, शिपराइटसाठी १०२ जागा, ब्लॅकस्मिथसाठी ७ जागा, बॉयलर मेकरसाठी २१ जागा, सिव्हिल वर्क्ससाठी ३८ जागा, कॉम्प्युटर फिटरसाठी १२ जागा, इलेक्ट्रॉनिक फिटरसाठी ४७ जागा, जायरो फिटरसाठी ७ जागा, मशिनरी कंट्रोल फिटरसाठी ८ जागा, सोनार फिटरसाठी १९ जागा, वेपन फिटरसाठी ४७ जागा, हॉट इन्सुलेटरसाठी ३ जागा, शिप फिटरसाठी १७ जागा, GT फिटरसाठी ३६ जागा, ICE फिटर क्रेन पदासाठी ८९ जागा आहेत.)


शैक्षणिक पात्रता- १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI, माजी नौदल प्रशिक्षणार्थी म्हणजेच भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी हवेत.


वयोमर्यादा – १८ ते २५ वर्ष


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२


अधिकृत वेबसाईट - www.indiannavy.nic.in


लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे  (CME PUNE)


पोस्ट – असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर


एकूण जागा – ५८  (यात असोसिएट प्रोफेसर पदासाठी १ जागा, आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ५७ जागा आहेत.)


शैक्षणिक पात्रता - असोसिएट प्रोफेसर पदासाठी B.E/B.Tech./M.E/B.Tech. (इलेक्ट्रिकल) मध्ये शिक्षण असणं आवश्य़क आहे आणिअसिस्टंट प्रोफेसर पदासाठी B.E/B.Tech./M.E/B.Tech./M.Sc/M.A/B.Arch./M.Arch. ही शैक्षणिक पात्रता हवी.


नोकरीचं ठिकाण आहे – पुणे


अर्ज तुम्ही ईमेलही करु शकता. ईमेल आयडी आहे-  femcme2022@gmail.com


अर्ज तुम्ही पोस्टानेही पाठवू शकता. पत्ता आहे. - S.O.1, COORD, फॅकल्टी ऑफ इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), दापोडी, पुणे- 411031


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मार्च २०२२


अधिकृत वेबसाईट - indianarmy.nic.in


संबंधित बातम्या:



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI