Kiccha Sudeep Covid Positive : दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) सध्या त्याच्या आगामी 'विक्रांत रोणा' (Vikrant Rona) या सिनेमामुळे चर्चेत आहे. किच्चा लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. पण आता किच्चा सुदीपला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक मणिरत्नम यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. अशातच आता किच्चा सुदीपला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. किच्चा सुदीपला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 


किच्चा सुदीप 'विक्रांत रोणा'च्या प्रमोशनला गैरहजर राहणार 


किच्चा सुदीप हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'फूंक', 'फूंक 2', 'रण' सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांतदेखील काम केलं आहे. तसेच सलमानच्या 'दबंग 3' मध्येदेखील किच्चा सुदीप दिसून आला होता. आता सलमान 'विक्रांत रोणा'चे प्रमोशन करत आहे. 


28 जुलैला 'विक्रांत रोणा' होणार प्रदर्शित


अनूप भंडारी लिखित आणि दिग्दर्शित 'विक्रांत रोना' थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 28 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Vikrant Rona : किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खाननेही केलं कौतुक!


Kiccha Sudeep : साऊथ चित्रपटांच्या यशाबाबत अभिनेता किच्चा सुदीपनं मांडलं मत; म्हणाला, 'हा कंटेन्टचा विजय'