Ideas of India Summit 2023 : Nitin Vijay : जर तुम्ही सर्वात कठीण विषय सोप्या भाषेत शिकवला तर विद्यार्थी तुमच्याशी लवकर कनेक्ट होतात. मी आयआयटीची तयारी करत असताना मला वैयक्तिकरित्या फिजिक्सची (Physics) भीती वाटायची. आयआयटीची तयारी करत असताना मला माझ्या पहिल्या परीक्षेत शून्य मार्क मिळाले आणि शिक्षकांना माझा पेपर लपवावा लागला. तेव्हा मला जाणवले की, फिजिक्स हा इतर विद्यार्थ्यांसाठीही कठीण विषय असू शकतो आणि हाच विषय मी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकवतो.जेणेकरून त्यांच्यासाठी गोष्टी सुलभ व्हाव्यात,” असे मोशन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ आणि संस्थापक नितीन विजय (NV sir Kota) म्हणाले.


एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत. अनेकांनी  'कोटा फॅक्टरी' ही वेब सीरीज पाहिली असेलच. त्यात विद्यार्थ्यांना कोणताही विषय अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजून सांगणारे पात्र म्हणजे जितू भय्या. हे पात्र नितीन विजय यांच्याशीच प्रेरित आहे. नितीन विजय हे विद्यार्थ्यांमध्ये 'एनव्ही सर' (NV sir Kota) खूप प्रसिद्ध आहेत. एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' मध्ये त्यांची मुलाखत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी घेतली.   

आपल्या आयआयटीच्या शिक्षणाबद्दल सांगतांना एनव्ही सर (NV sir Kota) म्हणाले की, “माझ्या वडिलांना सांगण्यात आले की, हे (आयआयटी) मी करू शकणार नाही. कारण प्रत्येकाला वाटत होते की मी सामान्य विद्यार्थी आहे. मात्र शिक्षकापुढील खरे आव्हान इथेच असते. जीवनात काहीतरी करण्याचा उत्साह असलेल्या सामान्य मुलांमधूनही शिक्षकांनी सर्वोत्तम गोष्टी घडवून आणल्या पाहिजेत. जर शिक्षक हे करू शकत असेल तरच तो स्वतःला शिक्षक म्हणवू शकतो.''


शिकवण्याच्या पद्धतींवर बोलताना ते (NV sir Kota) म्हणाले की, “शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लावणे खूप महत्वाचे आहे आणि जेव्हा मी बन्सल क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो, तेव्हा मला हे शिकायला मिळाले. ज्ञान असणे ही एक गोष्ट आहे आणि ते ज्ञान विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने पसरवणे ही वेगळी गोष्ट आहे. हे सर्व तुम्ही कसं मांडता यावर अवलंबून असते."


संबंधित बातमी: 


Ideas of India 2023 : स्टार्ट-अप आणि नव्या उद्योजकांसाठी इन्फोसिसचे संस्थापकांचा सल्ला, काय म्हणाले नारायण मूर्ती?


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI