Ideas of India 2023 Narayana Murthy on Star Up : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) आयडियाज ऑफ इंडिया (ABP Network Ideas of India Summit 2023) या परिसंवाद कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबई येथील कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. इन्फोसिसचे संस्थापक (Infosys Founder) एन.आर. नारायण मूर्ती (N.R. Narayana Murthy) यांनी  या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. नारायण मूर्ती यांनी स्टार्ट-अप (Star-Up) आणि नव्या उद्योजकांसाठी सल्ला दिला आहे. 


इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायण मूर्ती यांच्याशी चर्चा


आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023 च्या दुसऱ्या दिवशी, देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी हजेरी लावली. मूर्ती यांनी भारतीय आयटी उद्योगाचा ठसा जागतिक नकाशावर उमटवला आहे शिवाय, पण आयटी उद्योगात 'इन्फोसिस' ही दिग्गज कंपनी स्थापन केली. इन्फोसिस भारताच्या आयटी हबच्या शिखरावर असलेली कंपनी आहे.


स्टार्ट-अप आणि नव्या उद्योजकांसाठी सल्ला


नारायण मूर्ती यांनी स्टार्ट-अप (Star-Up) आणि नव्या उद्योजकांसाठी सल्ला देत सांगितलं आहे की, देशातील कोणत्याही कोपऱ्यात तुमचा व्यवसाय असो. पण तुम्ही सरकारच्या निधीवर अवलंबून राहू नका. सरकारच्या फंडिंगवर अवबंलून राहिल्यास तुमच्या व्यवसायाची व्यापती मर्यादित होईल. सरकारवर अवलंबून राहिल्यास तुमच्या व्यवसायावर मर्यादा येतात. अशा परिस्थितीत तुमच्या हाती निराशा येऊ शकते. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत विलंब होतो, त्यामुळे अशा वेळी नवोदित उद्योजकांची प्रतिभा आणि परिश्रम वाया जाऊ नये, असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं आहे.


वर्क फ्रॉर्म होमबाबत नारायण मूर्ती यांचं मत 


इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी घरून काम करणे म्हणजेच वर्क फ्रॉर्म होमबाबत त्यांचं मत मांडलं आहे. यावेळी मूर्ती म्हणाले की, "जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये वर्किंग कल्चर अर्थात कामाची पद्धत घडवायची असेल, तर ते निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. तरच तुमच्या कंपनीमध्ये कामाची योग्य पद्धत निर्माण शक्य आहे. जेव्हा आपण सगळे एकत्र येऊ तेव्हा हे सहज शक्य होतं. त्यामुळेच मी वर्क फ्रॉर्म होमच्या बाजूने नाही." असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं आहे.