ICSI CS Result 2023 : ICSI CS Professional 2023 च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. Institute of Company Secretaries of India ने ICSI CS चा निकाल आज (25 ऑगस्ट 2023) रोजी जाहीर केला आहे. उमेदवार ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जाऊन निकाल तपासू शकतात. 


व्यावसायिक कार्यक्रमाचा (professional programme) निकाल सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला आणि कार्यकारी कार्यक्रमाचा (Executive programme) निकाल दुपारी 2 वाजता जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर, वैयक्तिक उमेदवारांच्या विषयनिहाय गुणांसह निकाल संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम परीक्षेचा औपचारिक ई-निकाल-कम-संख्या तपशील देखील निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांसाठी वेबसाईटवर उपलब्ध असेल. निकालासह गुणांच्या तपशीलाची कोणतीही  प्रत जारी केली जाणार नाही. 


व्यावसायिक कार्यक्रम परीक्षेसाठी निकालासह गुणांचे तपशील निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील. निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत कोणत्याही उमेदवाराला निकाल-सह-गुण विधानाची हार्ड किंवा भौतिक प्रत प्राप्त झाली नाही, तर असे उमेदवार त्यांच्या तपशीलांसह example@icsi.edu वर संस्थेशी संपर्क साधू शकतात. निकाल तपासण्यासाठी थेट लिंक  https://icsi.examresults.net/ आहे.


उमेदवार या पद्धतीने निकाल डाऊनलोड करू शकता 



  • परीक्षेचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

  • त्यानंतर CS Result लिंकवर क्लिक करा.

  • या ठिकाणी तुम्ही तुमचे वैयक्तिक तपशील भरणं आवश्यक आहे. जसे की, तुमचं नाव, जन्मतारीख, सीट नं. ही माहिती भरून झाल्यानंतर सबमिट करा.

  • आता तुमच्यासमोर निकाल ओपन झाला असेल.

  • हा निकाल तुम्ही पाहून निकालाची प्रत देखील डाऊनलोड करू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या : 


दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता दोन टप्प्यात! ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्य


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI