ICSE, ISC Result 2022 : ISC आणि ICSE परिक्षेच्या पहिल्या सेमिसटरच्या निकालाची वाट अनेक जण पाहात असतील. 'काउंन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स' (CISCE)ने 10वी (ICSE) आणि 12वी (ISC) च्या पहिल्या सेमिस्टर परिक्षेचे निकाल जाहीर केला आहे.   cisce.org, results.cisce.org या वेबसाइट्स तुम्ही हा निकाल पाहू शकता. ICSE आणि ISC वर्ष 2021-22 च्या पहिल्या सेमिस्टर परिक्षेचा निकाल  काउंन्सिलच्या करिअर पोर्टलवर, वेबसाइटवर किंवा एसएमएसद्वारे तुम्ही पाहू शकता. एसएमएसद्वारे निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सात अंकी युनिक आयडी क्रमांक टाईप करून  09248082883 या नंबरवर पाठवू शकता. त्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या नंबरवर तुम्हाला एसएमएस येईल. 


वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी या  स्टेप्स करा फॉलो (CISCE Result Downloading Steps)
तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर cisce.org, results.cisce.org यापैकी कोणतीही एक वेबसाइट ऑपन करा.  
Results 2021 वर क्लिक करा. 
कोर्स कोड (ICSE/ISC), कँडिडेट UID, इंडेक्स नंबर आणि CAPTCHA टाका
ही माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. 
निकाल पाहिल्यानंतर तो तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता.







गेल्या वर्षी झाली होती परिक्षा 
ICSE ची परिक्षा गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2021  दरम्यान झाली होती. तर ISC ची परिक्षा 22 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. CISCE च्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही डिटेल्स मार्क चेक करू शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


HSC SSC EXAM: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी; विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, शिक्षणमंत्र्यांचं आवाहन


MSBTE Exam: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या


Mhada Exam : आज सार्वजनिक सुट्टी; म्हाडा भरती परीक्षा होणार, वेळापत्रकात बदल नाही


Share Market : शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI