Share Market Updates : रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक बैठकीच्या सावटाखाली शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच BSE सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरला. मात्र, अल्पावधीत सेन्सेक्स काही वेळेसाठी सावरला. मात्र, पुन्हा घसरण सुरू झाली. बाजारावर विक्रीचा दबाव कायम आहे. रिझर्व्ह बँकेची आज होणारी बैठक शासकीय दुखवट्यानिमित्ताने पुढे ढकलण्यात आली आहे. 


सकाळी 10.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 312 अंकांनी घसरून 58,336 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 100 अंकाची घसरण झाली. निफ्टी 17,413 अंकांवर ट्रेंड करत होता. 


 







प्री-ओपन सत्रापासून शेअर बाजारात घसरण


प्री-ओपन सत्रापासून शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी खाली आला. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स सुमारे 20 अंकांनी वाढून 58,600 च्या वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 10 अंकांच्या वाढीसह 17,500 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. आरबीआयची बैठक आणि कंपन्यांचे तिमाही निकाल, रुपयात होत असलेले चढ-उतार, ब्रेंट क्रूड आॅइलच्या किंमतीत होत असलेली वाढ आणि परदेशी गुंतवणूकदार यासारख्या देशांतर्गत घटकांमुळे भारतीय बाजार या आठवड्यात मोठे चढ-उतार होण्याची शक्यता आहे. 


आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात दिसून आला. जपानचा 'निक्की' निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारातही विक्रीचा दबाव आहे.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha