मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने बुधवारी स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) परीक्षेचा निकाल जाहीर केला. आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ibps.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन मोबाईल क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून पाहता येणार आहे. निकाल 12 जानेवारीपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
देशभरात आयबीपीएस स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी घेण्यात येणाऱ्या IBPS पूर्व परीक्षेचे आयोजन आज 26 आणि 27 डिसेंबरला करण्यात आले होते. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरणार आहे. मुख्य परीक्षा 24 जानेवारीला घेण्यात येणार आहे. याचे प्रवेशपत्र मुख्य परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी ibps.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपले डाउनलोड करावं असे निर्देश IBPS ने दिले आहेत. देशभरात 645 पदांसाठी घेण्यात येणाऱ्या IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
निकाल कसा पाहाल ?
- आयबीपीएसची अधिकृत ibps.in या संकेतस्थळावर जा.
- रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी माहिती देऊन लॉग इन करा.
- त्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI