IBPS RRB PO Result 2022 : IBPS ने ऑफिसर स्केल 1, 2 आणि   3 म्हणजेच IBPS RRB PO मेन्स चा निकाल जाहीर केला आहे.   IBPS PO परीक्षेचा निकाल आयबीपीएसने आपल्या  ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. आयबीपीएसकडून याबाबतची माहिती लवकरच दिली जाईल. 


पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी बसलेले उमेदवार IBPS च्या ibps.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या पदासाठी मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये झाली होती. या रिक्त पदांद्वारे 3,000 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे.  IBPS ने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 07 जून 2022 रोजी सुरू झाली होती. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 27 जून 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. या पदांसाठीच्या पूर्व परीक्षेचा निकाल 14 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झाला होता.  आता मेन्स परीक्षा दिलेले उमेदवार खाली दिलेल्या पायऱ्यांवरून निकाल पाहू शकतात. 


असा पाहा IBPS RRB PO Result 2022 चा निकाल
 सर्वात आधी IBPS च्या ibps.in या वेबसाईटवर जावा. 
आता पीओ रिजल्ट 2022 ची लिंक Click here to View Your Result Status of Online Main Examination for CRP-RRBs-XI-Officers Scale-I1’ वर क्लिक करा. 
आता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एंटर करा 
आता आयबीपीएस पीओ रिजल्ट 2022 डाऊनलोड करा 
 आयबीपीएस पीओ मेन्स रिजल्ट डाऊनलोड डायरेक्ट लिंक https://ibpsonline.ibps.in/rrbxis1may22/resta_oct22/downloadstart.php 


IBPS RRB ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आज संध्याकाळपर्यंत निकालाची लिंक वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.  एकदा निकालाची लिंक सक्रिय झाल्यानंतर उमेदवार त्यांच्या रोल नंबरच्या मदतीने आपला निकाल पाहू शकतात. या रिक्त पदांद्वारे अधिकारी स्केल 1 साठी एकूण 2676 पदांची भरती केली जाईल. 


लवकरच होणार मुलाखत 
आयबीपीएसने जाही केलेल्या अधिसूचनेनुसार, पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाते. मेन्समध्ये निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांना संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन आयबीपीएसकडून करण्यात आले आहे.  


महत्वाच्या बातम्या


MHT CET Result 2022 : महाराष्ट्र सीईटी LLB प्रवेश परीक्षेच्या पहिल्या फेरीची यादी जाहीर, असा पाहा निकाल 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI