Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. बारावी परीक्षेच्या 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.


बारावीच्या परीक्षेत  153 विषयांचा समावेश होता. त्यापैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेचा निकाल 98.30 टक्के, कला शाखेचा निकाल  90.51 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल  91.71 टक्के लागला आहे.  व्यवसाय अभ्यासक्रमात 92.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


निकालात मुलींचीच बाजी 


बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.  सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहा निकाल


यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com  या लिंकवर क्लिक करा.


कसा पाहाल आपला निकाल


स्टेप 1 - https://marathi.abplive.com//amp वर लॉन ऑन करा


स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा


स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका


स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा


स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 


स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI