Maharashtra HSC Result 2022 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 


निकालाबाबत आक्षेप असेल तर काय कराल?


निकाल हाती आल्यानंतरही अनेकांना आपल्या निकालाविषयी आक्षेप असतो. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या अवधित संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल.  त्यासाठी प्रतिविषय 300 रुपये भरावे लागतील.


गुणपडताळणीसाठी 50 रुपये शुल्क असून यासाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर 10 जून ते 20 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.


उत्तरपत्रिका हवी असेल तर काय कराल?


या परीक्षेतील उत्तर पत्रिकांचा झेरॉक्स कॉपी ज्या विद्यार्थ्यांना हव्या असतील त्यांना 10 जून ते 29 जून या कालावधीत महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी 400 रुपये महामंडळाकडे जमा करावे लागणार आहेत.


कोकण विभाग टॉपवर तर मुंबई सर्वात कमी 


सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 97.22 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (90.91 टक्के) आहे. 


विभागनिहाय निकाल 
कोकण - 97.22 टक्के 
पुणे - 93.61 टक्के 
कोल्हापूर - 95.07 टक्के 
अमरावती - 96.34 टक्के 
नागपूर - 96.52 टक्के
लातूर -  95. 25 टक्के
मुंबई - 90.91 टक्के
नाशिक - 95.03 टक्के
औरंगाबाद - 94.97 टक्के


निकालात मुलींचीच बाजी 


बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.  सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहा निकाल


यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com  या लिंकवर क्लिक करा.


कसा चेक कराल आपला निकाल


स्टेप 1 - https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा


स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा


स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका


स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा


स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 


स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI