HSC Result : राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला, मात्र यावर्षीच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियांबाबत अद्याप स्पष्टता नाही. पारंपरिक अभ्यासक्रम म्हणजेच, बी ए ,बी कॉम, बी एसस्सी या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार की नाही? याबाबत आता उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने ठरवून निर्णय घ्यायचा आहे. यावर्षी बारावीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न घेता अंतर्गत मूल्यमापनद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालात गुणांचा फुगवटा नक्कीच पाहयाल मिळतोय.  


उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे सर्व 13 अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पारंपरिक अभ्यासक्रमच्या प्रवेशप्रक्रियांबाबत लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे. यासाठी खास समिती नेमण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, याबाबत निर्णय घेऊन, प्रवेशप्रक्रियेबाबत स्पष्टता कधी येणार? याची विद्यार्थी आणि पालक वाट पाहत आहेत. दरवर्षी बारावीचा निकाल जाहीर झाला की, प्रत्येक विद्यापीठाचे पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होते. बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच पारंपारिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी जाहीर होते. आणि त्यानुसार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार विद्यापीठांतर्गत कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. 


तर दुसरीकडे, इंजिनियरिंग, लॉ, हॉटेल मेनजेमेंट, फार्मसी यासारख्या पदवी प्रथम वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्यात सीईटी प्रवेश परीक्षा घेऊन त्यात मिळलेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यामुळे आता एकीकडे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झालेला असताना यावर्षी विद्यापीठ स्तरावर पारंपरिक अभ्यासक्रमच्या प्रवेशाबाबत सुद्धा प्रवेश परिक्षेचा निर्णय घेतला जातो? की मग दरवर्षी प्रमाणे बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो, हे पहावं लागणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI