- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
HSC Exam Result 2025 LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के
HSC Result 2025 Live Maharashtra : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ऑनलाईन निकालासाठी mahresult.nic.in, results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, https://hscresult.mkcl.org/ भेट द्या
पार्श्वभूमी
HSC Result 2025 Declared : महाराष्ट्रातील बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2025) जाहीर झाला आहे. बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होईल अशी माहिती काल बोर्डाने दिली होती. त्यानुसार बोर्डाने...More
बीड : आज बारावीचा निकाल लागला. मला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत. माझी नीटची देखील तयारी सुरू आहे. परंतु, काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे. त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. परंतु मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता. त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला देखील अटक केली जावी, अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली आहे.
धाराशिव जिल्ह्याचा 92.32% निकाल, लातूर विभागात पहिला क्रमांक
राज्यभरातील आज बारावीचा निकाल जाहीर झाला. लातूर विभागाचा निकाल 89.46% एवढा आला आहे. तर लातूर विभाघात धाराशिव जिल्हा अव्वल स्थानी असून धाराशिवचा निकाल हा 92.32% एवढा आहे. तर 90.82% आणि 86.68% निकालासह नांदेड दुसऱ्या तर लातूर जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. लातूर विभागातून 90277 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 80 हजार 770 विद्यार्थी पास झाले आहेत
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती, तर देशमुख कुटुंबावर शोककळा पसरली होती. मात्र, या कठीण काळातही संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने अपार धैर्य दाखवत बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सोमवारी ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालानुसार वैभवीने 85.33 टक्के गुण मिळवले आहेत. तिने एकूण 600 पैकी 512 गुण मिळवत आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची प्रचिती दिली आहे.
वैभवीचे विषयानुसार गुण पुढीलप्रमाणे
इंग्रजी: 63
मराठी: 83
गणित: 94
भौतिकशास्त्र : 83
रसायनशास्त्र : 91
जीवशास्त्र : 98
सविस्तर बातमी वाचा
HSC Exam Result 2025: संतोष देशमुखांच्या लेकीचा बारावीचा निकाल, वैभवी देशमुखला किती टक्के?
बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखला बारावीमध्ये ८५ टक्के गुण, बायोलॉजीमध्ये 98, केमीस्ट्रीमध्ये 91 गुण
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा
नाशिक विभागात एकूण ०१ लाख ५८ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ०१ लाख ५७ हजार ८४२ विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यामधील ०१ लाख ४४ हजार १३६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यातील नऊ विभागांमध्ये नाशिकचा सातवा क्रमांक आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांतील एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, आणि त्यामधून ६,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णता टक्केवारी ९२.३८ इतकी झाली आहे.
बारावीचा निकाल, बोर्डाची संपूर्ण पत्रकार परिषद
यंदा निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37% होता
फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के
निकालाचा टक्का 1.49 ने यंदा कमी
२०२७ -२८ मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार
9 विभागीय मंडळात कॉपी प्रकरण
१२४ केंद्र चौकशी करून कारवाई होणार
पुणे ४५ नागपूर ३३ छत्रपती संभाजी नगर 214 मुंबई 9 कोल्हापूर 7 अमरावती 17 नाशिक 12 लातूर 37 एकूण ३७४ कॉपी प्रकार उघडकीस..
३३७३ केंद्रांपैकी १२४केंद्राची चौकशी होणार
गैरप्रकार या केंद्रांवर आढळल्याने चौकशी होणार
या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास १२४ परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार
2027-28 मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.
3373 केंद्रांपैकी 124 केंद्राची चौकशी होणार आहे. कारण या केंद्रांवर गैरप्रकार आढळला होता. त्यामुळे या केंद्रांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाला पाहता येणार आहेत. सध्या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली.
विभागनिहाय निकाल (HSC result 2025 Region Wise Result Statistics)
पुणे – 91.32%
नागपूर – 90.52%
संभाजीनगर – 92.24%
मुंबई – 92.93%
कोल्हापूर – 93.64%
अमरावती – 91.43%
नाशिक – 91.31%
लातूर – 89.46%
कोकण – 96.74%
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त आहेत.
यंदा निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37% होता
फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के
निकालाचा टक्का 1.49 ने यंदा कमी
यंदा बारावीचा निकाल ९१.८८%
राज्यातील मुलींच्या ९४.५८ टक्के निकाल
राज्यातील मुलांचा ८९.५१ टक्के निकाल
यंदाही राज्यात मुलींची बाजी
विज्ञान- ९७.३५
कला- ८०.५२
वाणिज्य- ९२.६८
व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३
आयटीआय- ८२.०३
एकूण ९ विभाग
पुणे -९१.३२
नागपूर- ९०.५२
संभाजीनगर-९२.२४
मुंबई-९२.९३
कोल्हापूर- ९३.६४
अमरावती-९१.४३
नाशिक- ९१.३१
लातूर-८९.४६
कोकण- ९६.७४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
२. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
५. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बोर्डाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहाता येणार आहे.
आपल्या उज्ज्वल भविष्याचा निर्णय घेण्यासाठी ज्या निकालाची उत्सुकता असते अशा बारावीच्या परीक्षेचा निकाल अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. ११ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान विद्यार्थांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना आज निकालाच्या स्वरूपात मिळणार आहे. दरवर्षी मुली बारावीत अव्वलस्थान पटकावतात. यंदा मुली हा रेकॉर्ड कायम ठेवणार की मुलं पहिल्या क्रमांकावर आपला ठसा उमटवणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील उपलब्ध होईल तर उद्यापासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. अशातच हा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? विद्यार्थ्यांना गुण कळणार की फक्त पास-नापास समजणार? निकाल पाहताना अडचणी आल्या तर काय कराल? अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घेऊ. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
यावर्षी महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत झाली होती. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत झाली. दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
दहावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान,दरम्यान, राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली आहे. या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89, तर बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा
परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. याशिवाय, विद्यार्थी इतर अधिकृत पोर्टलवर देखील त्यांचे निकाल तपासू शकतील.
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
राज्यातील बारावीचा निकाल (HSC Result 2025) आज म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- मुख्यपृष्ठ
- शिक्षण
- HSC Exam Result 2025 LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के