Thane Mira Road Crime News : ठाण्यातील मीरा रोड (Thane Mira Road) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील विनय नगरमधील JP नॉर्थ बार्सिलोना बिल्डिंग (JP North Barcelona Building) सोसायटीमध्ये दहशतीचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या गेटवर नोंदणी नसलेल्या गाडीला प्रवेश नाकारल्यानं वाहनचालक आणि त्याच्या साथीदारांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला (Attack on security guard) चढवल्याची घटना घडलीय. आरोपींनी सोसायटीतील 8 जणांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. यात 3 सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत.
आरोपींकडे देशी कट्टा
मीरा रोड येथील विनय नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. JP नॉर्थ बार्सिलोना बिल्डिंग सोसायटीमध्ये गुंडागर्दीचा एक प्रकार समोर आला आहे. नोंदणी नसलेल्या गाडीला प्रवेश नाकारल्यानं वाहनचालकाने थेट सुरक्षारक्षकांवरच हल्ला चढवला आहे. कशिश गुप्ता आणि अक्षित गुप्ता अशी हल्लेखोरांची नावे आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला आहे. आरोपींकडे देशी कट्टा होता आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना धमकावलेही होते.
आरोपी नशेत धुंद, काशी गाव पोलिसांना केला गुन्हा दाखल
प्राथमिक माहितीनुसार आरोपी नशेत धुंद होते. त्यांनी गाझियाबादची झलक दाखवतो असं म्हणत धाक दाखवत होते. याप्रकरणी मीरा रोडच्या काशी गाव पोलिसांनी FIR नोंदवले आहे. आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल सध्या प्रलंबित आहे. या घटनेमुळं सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: