HSC and SSC Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षा (HSC and SSC Exam) महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, आपल्या मुलाला परिक्षेला जात असताना पालक परीक्षा केंद्रांवर गर्दी करत असतात. शिवाय शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची देखील लगबग पाहायला मिळते. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय घेतलाय. दहावी, बारावीच्या परीक्षा (HSC and SSC Exam) केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय शिक्षण बोर्डाकडून घेण्यात आलाय. ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचार्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (HSC and SSC Exam) विभागीय मंडळास दिले आहेत.
कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताहाचे आयोजन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा दि. 11/02/2025 ते दि. 18/03/2025 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा दि. 21/02/2025 ते दि. 17/03/2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गांनी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असतात, त्या अनुषंगाने
1) मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत, मा. शिक्षणमंत्री महोदय याच्या मार्गदर्शनाखाली आगामी फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेचे वेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 20 जानेवारी ते दिनांक 26 जानेवारी 2025 या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
याबाबत करावयाच्या कार्यवाहीचा तपशील सोबत पाठविण्यात येत आहे. सदर सप्ताह आयोजित करणेसंदर्भात आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत सूचित करावे.
2) परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचान्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
परीक्षापूर्व कालावधीत करावयाची कार्यवाही
1. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उद्बोधन, जनजागृती व वातावरणनिर्मिती विविध माध्यमांतून करावी.
2. परीक्षेदरम्यान परीक्षाथ्यान गैरमार्गाचा अवलंब केल्यास मंडळाकडून होणा-या शास्तीची पूर्वकल्पना सर्व विद्यार्थी व पालक यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दिली जाईल, याबाबत खातरजमा करण्यात यावी.
3. परीक्षा केंद्रावर परीक्षा निर्धारित कालावधीत सुरू होईल तसेच निर्धारित वेळेत संपेल याबाबत दक्षता घेण्यात यावी.
4. परीक्षा सनियंत्रणासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात यावे.
5. प्रत्येक केंद्रावर उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकारी (तहसिलदार/गट विकास अधिकारी) यांच्या भेटीसंबधी सुव्यवस्थित नियोजन करणे.
6. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आपल्या जिल्हयातील सर्वसाधारण, संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रे निश्चित करून सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.
7. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एका भरारी पथकाची नेमणूक करावी. जर एखाद्या तालुक्यात परीक्षा केंद्रांची संख्या जास्त असेल तर आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक भरारी पथकांची नियुक्ती करावी.
8. भरारी पथकात किमान चार सदस्य असावेत. त्यामध्ये वर्ग १/२ चे अधिकारी असावेत. शिवाय वर्ग ३ चे कर्मचारी असावेत. प्रत्येक भरारी पथकात किमान एक महिला प्रतिनिधीचा समावेश असावा,
9. परीक्षा केंद्रांना भेटी देताना दक्षता पथकातील अधिकान्यांनी केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख यांच्यासोबत परीक्षा दालनास भेटी देणे.
10. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चा वापर करण्याबाबत पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविण्यात यावे, परीक्षा केंद्रावर पोलीस अधिनियम ३७ (१) (३) लावूनही बाहय उपद्रव कमी होत नसेल तर अशा केंद्रावर १४४ कलम लागू करावे.
11. सर्व परिरक्षण केंद्रावर हत्यारी पोलीस बंदोबस्त देण्यात यावे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI