जालना : राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शाळा अद्याप सुरू करू नयेत, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान 18 वर्षापेक्षा जास्त मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचही ते म्हणाले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. राज्यात 

Continues below advertisement


राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली
शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील पालकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये आतापर्यंतच्या डेटावरून राज्यातील सुमारे 85 टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील  सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. 


School Reopen | शाळा सुरू करण्याबाबत 85 टक्के पालकांचा होकार; शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर


आरोग्यमंत्री अनुकूल नाही
राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग तयारी करत असले तरी शाळा सुरु करू नये, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोंदवले आहे. अद्याप लहान मुलांचे लसीकरण झाले नाही. अशातच तिसरी लाटही तोंडावर आहे. लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भावाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे टोपे म्हणाले. 


राज्यातील कोविड मुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरु होणार!


राज्यात बाहेरुन येणाऱ्यांसाठी 48 तासांच्या आतील कोरोना रिपोर्ट आवश्यक
तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात प्रवेश करताना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना 48 तासांची मुदत असलेला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असणार आहे. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यांना मात्र राज्यात प्रवेश मिळणार आहे. आज जालनामध्ये एबीपी माझाशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI