मुंबई : राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
ज्या गावात आठवी ते बारावी वर्ग सुरु करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा. शिवाय,ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून आज पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे
शाळा सुरु करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशी सूचना दिल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी आणि दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI