मुंबई : यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना तीन एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 23 एप्रिल पासून इयत्ता बारावी बोर्डाची ची परीक्षा राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यानुसार आता या परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील.


विभागीय मंडळाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉलतिकीटची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिल्यानंतर हॉल तिकीट वर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का त्या हॉल तिकीटवर असणे आवश्यक आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासकीय रेखाकला परीक्षा न घेण्याचा निर्णय


शिवाय, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर हॉल तिकीटमध्ये विषय माध्यम नाव व इतर काही दुरुस्ती असेल तर त्याबाबत माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने मंडळामार्फत हॉल तिकीटवर दुरुस्ती करून घ्यावयाची आहे. हॉल तिकीटवर ज्या काही दुरुस्ती केली असतील त्याची एक प्रत बोर्ड कार्यालयात सुद्धा शाळांनी पाठवायची आहे. 


Maharashtra HSC SSC Exam 2021: कोरोनामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले हॉल तिकीट गहाळ झाल्यास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्याला हॉल तिकीट द्वितीय प्रत (डुब्लीकेट कॉपी) प्रिंट करून द्यायचे आहे. शिवाय, त्यावर डुप्लिकेट हा शेरा सुद्धा देण्यात यावा, अशा सूचना बोर्डाकडून केल्या आहेत. हॉलतिकीट वरील फोटो सदोष असल्यास मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का त्यावर घ्यायचा आहे. जेणेकरून, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना हॉल तिकीट संदर्भात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI