CUET PG 2023 Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) CUET PG 2023 परीक्षेसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. NTA च्या माहितीनुसार 1 जून ते 10 जून 2023 या कालावधीत पुढील शैक्षणिक सत्रासाठी पोस्ट ग्रेजुएट कोर्ससाठी कॉमन यूनिवर्सिटी एंट्रंस परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. ज्यासाठी अर्जाची प्रक्रिया मार्च 2023 च्या मध्यात सुरू होईल. यावर्षी CUET-PG च्या माध्यमातून पोस्ट ग्रेज्युएशन अॅडमिशनसाठी 30 हून अधिक केंद्रीय विद्यापीठांनी सहभाग घेतला होता.
परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून?
विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) एम जगदीश कुमार यांनी सांगितले की, या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया मार्चच्या मध्यभागी सुरू होईल. यूजीसी चेअरमन पुढे म्हणाले की, CUET-PG स्कोअर वापरून विद्यार्थी अनेक विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी असेल. ते म्हणाले की CUET-PG ची ही दुसरी आवृत्ती असेल. या वर्षी 30 हून अधिक केंद्रीय विद्यापीठांनी पोस्ट ग्रेज्युएशन अॅडमिशनसाठी या प्रवेश परीक्षेत भाग घेतला.
1 ऑगस्टपासून परीक्षा
अंडर ग्रॅज्युएशन कोर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 21 मे ते 31 मे 2023 या कालावधीत CUET घेण्यात येणार आहे. या वर्षी CUET-UG मध्ये 90 हून अधिक विद्यापीठांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. CUET PG परीक्षेचा निकाल जुलै 2023 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल. CUET-UG चे निकाल जून 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात घोषित केले जातील. यूजीसीच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, याचे शैक्षणिक सत्र या वर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल.
अॅडव्हांस कॅलेंडर जारी
प्रमुख प्रवेश परीक्षांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अॅडव्हांस कॅलेंडर जारी केले आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) चा पहिला टप्पा 24 ते 31 जानेवारी आणि दुसरा टप्पा 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. याशिवाय वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) 7 मे पासून घेण्यात येणार आहे.
CBSE बोर्डाच्या 2 जानेवारीपासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) शैक्षणिक सत्र 2022-23 साठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्ड 02 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 दरम्यान इयत्ता दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीसाठी (CBSE 12th Exams) प्रॅक्टिकल परीक्षा (Practical Exams) घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचं आवाहन बोर्डानं शाळांना केलं आहे. बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SoP) आणि मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत.
इतर बातम्या
CBSE Board Exam 2023: 2 जानेवारीपासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा, CBSE बोर्डाकडून गाईडलाईन्स जारी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI