CUET UG Result 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) CUET UG चा निकाल सप्टेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात घोषित करू शकते. निकाल अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर घोषित केले जातील. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतात.


24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान परीक्षा
12 ते 14 ऑगस्टऐवजी आता 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार आहे. NTA ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, जे विद्यार्थी CUET फेज 2 च्या परीक्षेत बसू शकले नाहीत, त्यांना 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या फेज 6 च्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र 20 ऑगस्ट 2022 रोजी जारी केले जातील. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.


निकाल कधी जाहीर होईल?
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, CUET UG चा सहावा आणि अंतिम टप्पा 30 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. आम्ही लवकरच मूल्यांकन जाहीर करण्याचा प्रयत्न करू. आशा आहे की 7 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर होईल.



फेज 3 परीक्षा कधी होईल?
तिसऱ्या टप्प्याची परीक्षा 7, 8 आणि 10 ऑगस्ट रोजी होणार होती, आता ही परीक्षा 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. उमेदवारांना परीक्षेशी संबंधित नवीन अपडेटसाठी NTA वेबसाइट www.nta.ac.in तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फेज 3 परीक्षेचे प्रवेशपत्र 17 ऑगस्ट 2022 रोजी जारी केले जाईल. CUET UG परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि वेळोवेळी त्यांची तपासणी करत रहावे.


संबंधित बातम्या


Marathwada: मराठवाड्यातील अंगणवाड्या 'लय भारी'; गतवर्षाच्या तुलनेत 13 हजार विद्यार्थी वाढले


NEET PG 2022 : NEET PG समुपदेशनाची तारीख जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक


कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी


​NEET UG Registration 2022 : NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ, 10 लाखांहून अधिक महिला उमेदवारांची नोंदणी


NEET PG समुपदेशनासाठी ही' आहेत आवश्यक कागदपत्रे


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI