CUET 2022 Exam Postponed : 17 राज्यातील विविध केंद्रांवर कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा (CUET 2022) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने अधिकृत वेबसाइट - nta.ac.in वर एक नोटीस जारी केली आहे. गुरुवारी CUET UG परीक्षा 2022 आयोजित करण्यात येणार होती, मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कधी होणार परीक्षा?
एनटीएच्या अधिकृत अधिसूचनेत म्हटलंय, 4 ऑगस्ट 2022 ला होणारी CUET (UG) - 2022 परीक्षा काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे 12 ऑगस्ट 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे,NTA नुसार, उमेदवारांसाठी फक्त जुने प्रवेशपत्र वैध असेल. एनटीएने सांगितले की 4 ऑगस्ट रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 12 ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा होणार आहे.णार आहे.
संबंधित राज्यांची आणि शहरांची यादी येथे पाहा
- अरुणाचल प्रदेश- नामसाई आणि पासीघाटी
- आसाम- नलबारी
- छत्तीसगड- बिलासपूर
- दिल्ली- नवी दिल्ली
- हरियाणा- अंबाला
- झारखंड- बोकारो, गिरिडीह, जमशेदपूर आणि रामगड
- लडाख - लेह
- मध्य प्रदेश - सागर
- महाराष्ट्र- औरंगाबाद, रायगड, सातारा आणि वर्धा
- ओडिशा- कोरापुट
- पुडुचेरी - कराईकल
- राजस्थान- जोधपूर
- तामिळनाडू- कोईम्बतूर, दिंडीगुल, तिरुवरूर, विलुप्पुरम, विरुधुनगर
इतर महत्वाच्या बातम्या
Patra Chawl Scam : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Murbad News : मुरबाडच्या गावकऱ्यांची व्यथा; चक्क होडीतून करावा लागतोय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना प्रवास
Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत
Todays Headline 5th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI