CSIR NET Result 2021: CSIR UGC NET जून 2021 परीक्षेचा निकाल जानेवारी-फेब्रुवारी 2022मध्ये नियोजित विविध तारखांना घोषित करण्यात आला आहे. सदर परीक्षा आयोजित करणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) बुधवार, 9 मार्च 2022 रोजी CSIR UGC NET निकाल जून 2021 जाहीर केला. निर्धारित 5 विषयांमधील JRF किंवा लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसरच्या पदांसाठी भरतीच्या पात्रतेसाठी CSIR-UGC च्या राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या जून 2021च्या आवृत्तीत परीक्षा देणारे उमेदवार त्यांचा निकाल आणि स्कोअर कार्ड आता पाहू शकतात.


तुम्ही परीक्षा पोर्टलवर csirnet.nta.nic.in दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून तपासू शकता. CSIR UGC NET जून 2021 स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करावी लागेल.


येथे पाहा निकाल 


NTA ने जारी केलेल्या सूचनेनुसार, CSIR UGC NET जून 2021ची परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) 29 जानेवारी आणि 15 ते 17 फेब्रुवारी 2022 दरम्यान देशभरातील 172 शहरांमधील 339 केंद्रांवर घेण्यात आली होती. JRF साठी 1,45,719 नोंदणी आणि लेक्चरशिप/सहाय्यक प्राध्यापकांसाठी 61,587 सह एकूण 2,07,306 नोंदणी होत्या. तथापि, केवळ 1,59,824 उमेदवार परीक्षेला हजर होते, त्यापैकी 1,18,861 JRF आणि 40,963 लेक्चरशिप/सहाय्यक प्राध्यापकांसाठी इच्छुक होते.


परीक्षा आयोजित केल्यानंतर, NTA ने CSIR-UGC NET जून 2021च्या परीक्षेसाठी अनौपचारिक ‘आन्सर की’ जारी केल्या होत्या आणि उमेदवारांना 22 ते 25 फेब्रुवारी 2022पर्यंत त्यांच्या हरकती मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. यांचे पुनरावलोकन केल्यानंतर, फायनल ‘आन्सर की’ निर्धारित करताना CSIR UGC-NET जून 2021चे निकाल NTA ने जाहीर केले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI