CISCE Class 10th & 12th Board Exams 2022 : यावर्षी महामारीमुळे, CBSE (CBSE परीक्षा 2022) आणि CISCE (CISCE परीक्षा 2022) बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात आल्या होत्या. मुख्य परीक्षा टर्म एक (Term 1) आणि टर्म टू (Term 2) अशा दोन भागांमध्ये विभागली गेली होती. या पॅटर्नबाबत, कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) नं जाहीर केलं आहे की, पुढील वर्षापासून ते दोन नव्हे तर एकाच वेळी परीक्षा घेतील. म्हणजेच, CISCE बोर्डानं पुन्हा जुन्या पॅटर्नवर येण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून, ISC (ISC Exams 2023) आणि ICSE (ICSE Exams 2023) च्या अंतिम परीक्षा फक्त एकदाच घेतल्या जातील.
या महिन्यांत परीक्षा होण्याची शक्यता
बोर्डानं असंही स्पष्ट केलं आहे की, CISCE बोर्डाच्या दहावी आणि बारावी म्हणजेच, ISC आणि ICSE परीक्षा (CISCE 10th & 12th Exams 2023) पूर्वीप्रमाणेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येतील. या संदर्भातील सूचना मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर (CISCE) तपासता येईल. हे करण्यासाठी, CISCE च्या cisce.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
अभ्यासक्रमही सुधारित करणार
परीक्षेच्या पॅटर्नसोबतच बोर्डानं नवीन सुधारित अभ्यासक्रमही अधिकृत वेबसाइटवर अपलोड केला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ देता यावा, यासाठी शाळांना अभ्यासक्रमानुसार, शैक्षणिक दिनदर्शिकेचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जुलै महिन्यात प्रसिद्ध होणार नमुना पेपर (Specimen Paper)
CISCE बोर्डानं जुलै 2022 मध्ये नमुना पेपर म्हणजेच, मूळ पेपर सारखीच नमुना पेपर सोडवण्याची योजना देखील आखली आहे. सर्व विषयांचे नमुना पेपर विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Nagpur University Exam : नागपूर विद्यापीठाकडून अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा,विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ
- UPSC CDS 2 Exam 2022 : यूपीएससी एनडीए 2 परीक्षेचं नोटिफिकेशन आज येण्याची शक्यता, अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
- CBSE Term 2 10th 12th Result 2022 : CBSE टर्म 2 चा निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या तारीख, वेळ
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI