Central Bank Jobs 2021 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने काही दिवसांपूर्वी स्पेशलिस्ट ऑफिसरच्या (Specialist Officer) 115 पदांवर भरती घेऊन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम तारिख 17 डिसेंबर आहे. जर तुम्हालाही सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये नोकरीची संधी गमवायची नसेल तर दिलेली मुदत संपण्यापूर्वी अर्ज करा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. या पदांवर उमेदवारांची निवड भरती चाचणीच्या आधारे केली जाईल. 


इथे पाहा वेकंसी डिटेल्स 


स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या एकूण 115 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये सिक्युरिटी ऑफिसर, रिस्क मॅनेजर, फायनॅशियल अॅनालिस्ट क्रेडिट ऑफिसर, इकोनॉमिस्ट, डाटा सायंटिस्ट, टेक्निकल ऑफिसर, लॉ ऑफिसर, इनकम टॅक्स ऑफिसर यांसारख्या पदांचा समावेश आहे. कॅटगरीनुसार, वेकंसी पाहण्यासाठी तुम्हाला भर्तीचं नोटिफिकेशन डाऊनलोड करावं लागेल. 


अर्ज करण्याच्या तारखा 



  • ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 23 नोव्हेंबर 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2021 

  • अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2021 

  • भरती परीक्षेची तारीख : 22 जानेवारी 2022 

  • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख : जानेवारी 2022


आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा


स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या या दोन वेगवेगळ्या पदांवर संबंधित स्ट्रीममध्ये डिग्री किंवा डिप्लोमा मिळवलेले उमेदवार अर्ज करु शकतात. नोटिफिकेशननुसार, या पदांवर केवळ तेच उमेदवार अर्ज करु शकतील, ज्यांच्याकडे या क्षेत्रात 3 ते 10 वर्षांचा अनुभव आहे. तुम्हाला अधिसूचनेत पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती मिळेल.


असा करा अर्ज


सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी योग्य उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट https://centralbankofindia.co.in जाऊन अर्ज करु शकतात. जेव्हा तुम्ही वेबसाइटच्या भरती विभागात जाल तेव्हा तुम्हाला या भरतीची अधिकृत सूचना आणि अर्ज भरण्याची लिंक मिळेल. इच्छुक उमेदवार अधिसूचना पाहिल्यानंतर, त्यात दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करु शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI