CBSE Class 10th 12th Exam 2022 : दहावी बारावी बोर्डाच्या सीबीएसई  परीक्षेला बसणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिकाचे कॉपी cbse.gov.in किंवा cbseresult.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉपर्स विद्यार्थ्यांची केवळ उत्तरपत्रिका अपलोड करणार नाही तर त्यांच्या शाळेत देखील उत्तरपत्रिका पाठवण्यात येणार आहे. सीबीएससीने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगला पेपर कसा सोडवावा या विषयी मार्गदर्शन मिळेल. दरम्यान सीबीएससीने टर्म-1 च्या परीक्षेचे निकाल अद्याप ऑनलाईन  जाहीर केलेले नाही. तर दहावी आणि बारावी टर्म-1 चे निकाल संबंधित शाळांना पाठवण्यात येणार आहे.


सीबीएसई  टर्म- 2 परीक्षा 26 एप्रिलापासून सुरू होणार असून 15 जूनला परीक्षेचा शेवटचा पेपर असणार आहे.  तर दहावीची परीक्षा 24 मे ली संपणार आहे. बारावीची परीक्षा 15 जूनला संपणार आहे. परीक्षा क्रमांकात कोणतेही बदल कऱण्यात आलेले नाही. टर्म 1 च्या परीक्षेसाठी जे क्रमांक  होते तेच क्रमांक टर्म-2 साठी असणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे लागणार आहे.


सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbseacademic.nic.in अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड घेण्यासाठी शाळेची मदत घ्यावी लागणार आहे. 


CBSE टर्म 2 प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?


1- अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.


2- होमपेजवर दिसणार्‍या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.


3- तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा.


4- प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.


5- डाउनलोड करा आणि CBSE टर्म 2 परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत नेहमीच तुमच्याकडे ठेवा.


संबंधित बातम्या :


CBSE Term 2 Admit Card: CBSE टर्म 2चे अ‍ॅडमिट कार्ड लवकरच जारी केले जाणार, जाणून घ्या कसे कराल डाऊनलोड



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI