CBSE Term 2 Admit Card: CBSE बोर्डाची परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे. यावर्षी, नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, CBSE बोर्ड 10वी आणि 12वी परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. CBSE टर्म 1ची परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती, ज्याचा निकालही विद्यार्थ्यांच्या शाळेत पाठवण्यात आला होता. CBSE बोर्डाचे विद्यार्थी सध्या त्यांची प्रवेशपत्रे (CBSE Term 2 Admit Card) जारी होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.


साधारणपणे परीक्षा सुरू होण्याच्या 3 आठवडे आधी प्रवेशपत्र जारी केले जाते. आता CBSE टर्म 2च्या परीक्षा सुरू होण्यासाठी जवळपास इतकाच वेळ शिल्लक राहिला आहे. अशा परिस्थितीत, सीबीएसई बोर्ड (CBSE Exam 2022) लवकरच प्रवेशपत्रासंबंधी कोणतीही माहिती अपलोड करू शकेल, अशी अपेक्षा आहे.


प्रवेश फक्त प्रवेशपत्राद्वारे दिला जाईल. CBSE बोर्ड परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना फक्त प्रवेशपत्राच्या आधारावरच प्रवेश देण्यात येणार आहे. सदर प्रवेशपत्र CBSE बोर्डाच्या वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतर, तुमचे तपशील पूर्णपणे तपासल्यानंतरच ते डाउनलोड करा. त्यात काही चूक असेल, तर ती तातडीने दुरुस्त करा.


CBSE टर्म 2 प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?


1- अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.


2- होमपेजवर दिसणार्‍या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.


3- तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा.


4- प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.


5- डाउनलोड करा आणि CBSE टर्म 2 परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत नेहमीच तुमच्याकडे ठेवा.


हेही वाचा :



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI