CBSE result term 1 class 12 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या टर्म – 1 परीक्षा 2021चा निकाल जाहीर केला आहे. (CBSE 12th Term 1 Result)   सीबीएसई दहावी प्रमाणेच बारावीचेही विद्यार्थी आपल्या शाळेतून निकाल प्राप्त करतील. यावेळी सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केलेला नाही. यापूर्वी संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. शाळा विद्यार्थ्यांचा निकाल डाऊनलोड करू शकते. लवकरच दहावी आणि बारावी टर्म 1चे निकाल देखील अधिकृत वेबसाईटवर cbseresults.nic.in प्रसिद्ध केले जातील अशी अपेक्षा आहे. 


बारावीचा निकाल शाळांकडे पाठवण्यास सुरुवात सीबीएसईकडून बारावीच्या टर्म 1 परीक्षेचे निकाल शाळांकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. टर्म 1 परीक्षा आणि टर्म 2 परीक्षेचा निकाल एकत्रितपणे मार्कशीटवर आगामी काळात जारी केले जातील. सीबीएसईकडून नव्या शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्म घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थी आपला निकाल/स्कोरकार्ड सीबीएसई अधिकृत संकेतस्थळावरुन cbse.gov.in, cbseresults.nic.in डाउनलोड करु शकतील. त्यासोबत डिजीलॉकर अप आणि संकेतस्थाळावरुनही digilocker.gov.in स्कोरकार्ड प्राप्त करु शकतील.  दरम्यान, सीबीएसईने गेल्या आठवड्यात दहावी टर्म 1 परीक्षेचा निकाल घोषीत केला होता. विद्यार्थ्यांचा निकाल शाळेत पाठवण्यात आला होता. शाळेकडून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आला होता. आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेतच निकाल मिळेल.  






दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या टर्म परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 'या' ठिकाणी पाहा 
येत्या 26 एप्रिलपासून दुसऱ्या टर्मसाठी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक  सीबीएसईने जाहीर केलं आहे. सकाळी 10.30 वाजता या परीक्षांची वेळ सुरू होणार आहे. दुसऱ्या टर्मचे नवीन वेळापत्रक सीबीएसईने त्यांच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलं आहे.  दुसऱ्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांना ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी सँपल पेपर पॅटर्न फॉलो करण्यात येणार आहे.   


दहावी टर्म 1 चा निकाल जाहीर
सीबीएसईने 12 मार्च रोजी 10वी टर्म-1चा निकाल जाहीर केला. परंतु, विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकणार नाहीत. अहवालानुसार, सीबीएसईने शाळांना मेलद्वारे हा निकाल पाठवला आहे. यासाठी विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांशी संपर्क साधू शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांचे स्कोअर कार्ड अर्थात गुणपत्रिका मिळवू शकतात. स्कोअर कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो. तर, शाळा अधिकारी अधिकृत शैक्षणिक मेल आयडीद्वारे हा निकाल पाहू शकतात. अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासता येतील.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI