CBSE Board 10th-12th Result 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 12th Exams) संपून बराच काळ झाला आहे. आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होण्यापूर्वी तुम्ही हा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहाल, तसेच निकाल कोणत्या दिवशी पाहता येईल या संबंधित अधिक माहिती जाणून घ्या. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) एकाच दिवशी, काही तासांच्या कालावधीत 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. 


CBSE Exam Result 2023 : निकाल कधी जाहीर होणार?


सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर निकालाची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही. परंतु सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत या परीक्षांचे निकाल जाहीर होतील. परीक्षेचा निकाल जाहीर करण्याच्या तारखा CBSE द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाईट, ट्विटर हँडल आणि इतर सोशल मीडियावरुन जाहीर केल्या जातील. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर निकाल तपासण्याची पद्धत वेगळी आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती मिळाल्यानंतरच निकाल तपासा. तसेच, निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारख्या तपशीलाची नोंद करावी लागेल.


या वेबसाईट्सवर निकाल पहा


सीबीएसई बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या वेबसाईट्सवर तपासता येतील.


 results.cbse.nic.in


cbse.gov.in


 cbseresuts.nic.in


निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक असेल. याशिवाय इतर कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.




'या' तारखांना परीक्षा झाल्या



सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा या 21 मार्चला संपल्या तर बारावीच्या परीक्षा 5 एप्रिलला संपल्या. या परीक्षा होऊन एक महिना उलटून गेला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.


मीडिया रिपोर्ट्सवरनुसार, सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीत यावर्षी 38,83,710 विद्यार्थी बसले होते. यापैकी 21,86,940 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी तर,16,96,770 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत.


वेबसाईट तपासत रहा


दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात नवीन आणि अपडेटेड माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी अधिकृत वेबसाईट तपासावी लागेल. जेणेकरून उमेदवारांना नवीन अपडेट्स मिळतील.


महत्त्वाच्या बातम्या :


Beed News : नवोदय पात्रता परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला चक्क गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI